Police wipe out land mines in Gadchiroli  
विदर्भ

गडचिरोलीतील एटापल्लीत मोठा अनर्थ टळला; नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले भूसुरुंग पोलिसांनी केले नष्ट  

मिलिंद उमरे

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कोकोटी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पेरून ठेवलेले 10 किलोग्रामचे दोन भुसुरुंग पोलिसांनी नष्ट करत नक्षलवाद्यांचा घातपाताचा मोठा कट उधळून लावला.

मंगळवारी (ता. २३) उपविभाग एटापल्लीअंतर्गत येणाऱ्या कोटमी पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कोकोटी जंगल परिसरात प्राप्त गोपनीय माहीतीवरून विशेष अभियान पथक गडचिरोलीसह विशेष कृती दल व कोटमी पोलिस मदत केंद्राचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास कोकोटी गावाच्या उत्तरेला असलेल्या जंगल परिसरातील पहाडी भागात नक्षलवाद्यांनी कॅम्प लावलेला असल्याची संशयास्पद हालचाल दिसून आली. 

पोलिस जवान नक्षलवाद्यांच्या दिशेने आगेकुच करीत असताना जवानांना पाहून जेवण बनविण्याच्या तयारीत असलेल्या नक्षलवाद्यांनी प्लॉस्टिक शिट, स्वयंपाकाचे भांडे, भाजीपाला, राशन, पिण्याचे पाणी, चप्पल, जोडे, कपडे, पिट्टू तसेच खुप मोठया प्रमाणावर असलेले जीवनावश्यक साहित्य सोडून घनदाट जंगलाच्या दिशेने पळ काढला. जवानांनी या परिसरात शोध अभियान राबविले असता, पहाडीच्या पूर्व दिशेला १ व पश्चिम दिशेला १ असे दोन इलेक्ट्रीक वायर दिसुन आले. हे इलेक्ट्रीक वायरवरून नक्षलवाद्यांकडुन घातपाताची योजना असावी असा संशय आल्याने बॉम्बशोधक व नाशक पथकाकडून घटनास्थळाची तपासणी केली असता, नक्षलवाद्यांनी घातपाताच्या उद्देशाने १० किलोग्रॅमचे दोन ब्लॉस्ट पुरुन ठेवलेले असल्याचे आढळून आले. 

नक्षलवाद्यांनी जमिनीत पेरून ठेवलेला ब्लॉस्ट जमिनीबाहेर काढणे धोक्याचे असल्यामुळे बीडीडीएस पथकाकडुन जागेवरच नाश करण्यात आले. हे कृत्य कलम ३०७, १४३, १४७, १४८, १४९, १२० (ब) भादंवि सहकलम ४,५ भास्फोका अन्वये होत असल्याने या भागात सक्रीय असणाऱ्या कंपनी क्र.४ चा कमांडर प्रभाकर उर्फ रवी उर्फ प्रकाल वीर उर्फ पदकाला स्वामी उर्फ लोकेटी चंदर राव तसेच कसनसुर दलम डिव्हीसीएम व सहकारी नक्षलवाद्यांवर रेगडी पोलिस मदत केंद्रात फिर्याद नोंदवण्यात आली आहे. 

नक्षलविरोधात महत्वपुर्ण कारवाई करत नक्षलवाद्यांनी घातपाताचा कट उधळुन लावणाऱ्या जवानांच्या शौर्यपूर्ण कामगिरीचे पोलिस अधीक्षक  अंकित गोयल यांनी कौतुक केले असुन नक्षलविरोधी अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रुपाली चाकणकर यांना मोठा धक्का, सख्ख्या भावाचा निवडणुकीत दारुण पराभव

Kolhapur Gokul Milk Sangh : गोकुळ दूध संघावर प्रशासक की निवडणूक? अध्यक्ष नविद मुश्रीफांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीचा केला खुलासा

पहिल्या दिवसापासून सांगत होतो...; मस्साजोगच्या सरपंचपदाची निवडणूक जिंकल्यावर काय म्हणाले स्वरुपानंद देशमुख

Pune Crime: नारायणगाव बसस्थानकात धक्कादायक चोरी; महिलेच्या पर्समधून २० तोळे सोन्याचे दागिने लंपास, चोरट्यांची चलाखी!

Latest Marathi News Live Update: छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या अतिक्रमण कारवाईदरम्यान तणावाची परिस्थिती

SCROLL FOR NEXT