file photo 
विदर्भ

कर्तव्यावर जात असतानाच गेला पोलिसाचा जीव, अज्ञात वाहनाने दिली जब्बर धडक

ओमप्रकाश कुऱ्हाडे

शिरजगावकसबा (जि. अमरावती) : शिरजगावकसबा पोलिस ठाण्यात मागील चार वर्षांपासून कार्यरत असलेले पोलिस हेडकॉन्स्टेबल केशव महादेव सुने (रा. कांडली) यांचा सोमवारी (ता. ५) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. मंगळवारी (ता. सहा) त्याच्या राहत्या घरी पोलिसांनी केशव सुने यांना मानवंदना दिली.

पोलिस दलाभोवती कोरोनाचा विळखा घट्ट होत असतानाच कोरोनाला दूर ठेवण्यात यशस्वी ठरलेल्या केशव सुने पोलिसाचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

केशव सुने हे शिरजगाव पोलिस ठाण्याच्या सेवेत होते. ड्युटीवर जात असताना त्यांना काळाने गाठले. सुने रोजच्या प्रमाणे कर्तव्यावर जात असताना सायंकाळी सातच्या सुमारास वासनकर पेट्रोल पंपाजवळ एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. धडक इतकी जबर होती की यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शिरजगाव कसबा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच अवस्थेत पोलिसांच्या गाडीतून त्यांना उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला होता.

३१ वर्षे दिली सेवा

केशव सुने यांची अतिशय शांत स्वभावाचे पोलिस म्हणून गावात ओळख होती. ३१ वर्षांच्या पोलिस कारकिर्दीत जिल्ह्यातील अंजनगावसुर्जी, येवदा, रहिमापूर पोलिस ठाण्यात त्यांनी कर्तव्य बजावले. शिरजगाव कसबा ही त्यांची सासरवाडी असल्याने गावातील नागरिकांच्या ते परिचित होते.

अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, पत्नी दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. त्यांचीसुद्धा परिस्थिती नाजूक आहे. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, जवाई असा आप्त परिवार आहे. अभिजित श्रीराम दाभाडे यांच्या तक्रारीवरून शिरजगाव पोलिस ठाण्यात धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाच्या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक अमोल ढोकणे यांच्यासह पोलिस कॉन्स्टेबल इंगळे अधिक तपास करीत आहेत.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT