Pramod Shekokar Sakal
विदर्भ

पोलिस शिपायाने डोक्यात गोळी घालून केली आत्महत्या

अहेरी येथील पॉवरहाउस कॉलनीमधील एका अपार्टमेंटमध्ये पोलिस शिपायाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली.

सकाळ वृत्तसेवा

अहेरी (जि. गडचिरोली) - अहेरी येथील पॉवरहाउस कॉलनीमधील एका अपार्टमेंटमध्ये पोलिस शिपायाने (Policeman) डोक्यात गोळी (Shoot) झाडून आत्महत्या (Suicide) केली. ही घटना रविवारी (ता. २०) रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

प्रमोद शेकोकर असे पोलिस शिपायाचे नाव असून, ते प्राणहिता पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. त्यांची पत्नी ही ताडगाव पोलिस मदत केंद्रात कार्यरत आहे. माहिती पोलिस विभागाला प्राप्त होताच उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर, पोलिस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

दरवाजा आतमधून बंद असल्याने दुसऱ्या घरातून पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केला. आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकले नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. प्रमोद शेकोकर हे मूळ बुलडाणा जिल्ह्याचे असल्याची माहिती मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या निवासस्थानाची सुरक्षा करण्यासाठी त्यांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhadra Tiger Reserve Video : दुर्मिळ योगायोग! भद्रा व्याघ्र प्रकल्पात ब्लॅक पँथर आणि बिबट्या एकत्र पाणी पितानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद; VIDEO तुफान व्हायरल

"मरणाच्या दारात असताना त्यांनी मला इंजेक्शन दिलं" दिव्या शिंदेचे बिग बॉस टीमवर गंभीर आरोप; म्हणाली..

PNB Recruitment 2026: फ्रेशर्ससाठी नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नेशनल बँकमध्ये ५,१३८ पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

Latest Marathi News Live Update :धावत्या ट्रेनमधून वैतरणा नदीत पडला तरुण, सतर्कतेमुळे जीव वाचला

हॉटेलमध्ये चालवलं जायचं सेक्स रॅकेट, ५०० तरुणी, १०० ग्राहक; दलाल २० हजार घेऊन तरुणींना द्यायचे ५ हजार

SCROLL FOR NEXT