Poonam became the first female Dog coach in Vidarbha 
विदर्भ

विदर्भातील पहिली महिला श्‍वान प्रशिक्षक ठरली पूनम; मोलमजुरी करणाऱ्या युवतीच्या जिद्दीची कहाणी

शरद कनेर

मोर्शी (जि. अमरावती) : जिद्द, चिकाटी तसेच काहीतरी करण्याची उर्मी असली की कोणतेही क्षेत्र कमी नाही हेच खेड्यातील युवतीने दाखवून दिले आहे. सुरुवातीच्या काळात मोलमजुरी करणाऱ्या पुनम बाळसराफ या युवतीने श्‍वानांना प्रशिक्षित करण्यासाठीचे प्रशिक्षण पूर्ण करीत विदर्भातील पहिली महिला श्‍वान प्रशिक्षक होण्याचा मान पटकावला आहे.

मोर्शी तालुक्‍यातील येरला या छोट्याशा गावातील गरीब शेतकरी कुटुंबातील पदवीधर पूनम बाळसराफ हिने हलाखीच्या परिस्थितीमुळे आई-वडिलांना आर्थिक साहाय्य व्हावे या उद्देशाने आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘वैद्य ट्रेनिंग सेंटर’ येथे सुरुवातीच्या काळात मोलमजुरीचे काम करायला सुरुवात केली. कालांतराने श्वानांचे प्रशिक्षण पाहत असताना भविष्यात आपणालासुद्धा श्वान प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊ शकतो, ही भावना तिच्यात दृढ झाली. तशी इच्छा तिने अकॅडमीचे संचालक सुभेदार गणेश वैद्य यांच्याकडे व्यक्त केली.

सुभेदार वैद्य यांनी तिच्यातील जिद्द, चिकाटी, धाडस व परिश्रम करण्याची तयारी हेरून तिला होकार दिला. त्यानंतर तिने सहा महिने अत्यंत खडतर व कठीण असे श्‍वान प्रशिक्षण पूर्ण केले. दरम्यान, अनेकवेळा तिला विविध प्रजातींच्या श्‍वानांनी चावा घेतला. तरीसुद्धा न घाबरता तिने अतिशय आक्रमक अशा श्‍वानांना नियंत्रित करून त्यांच्यासोबत मैत्री केली.

मोर्शी येथे सुप्रसिद्ध ‘वैद्य डॉग ट्रेंनिग अकॅडमी’ असून याठिकाणी देश-विदेशातील अनेक ख्यातनाम व्यक्तींचे विविध प्रजातींचे श्‍वान प्रशिक्षणासाठी येत असतात. या श्‍वानांना प्रशिक्षित करणे अत्यंत जिकिरीचे व जोखमीचे असून त्यासाठी अत्यंत कुशल प्रशिक्षकाची गरज असते. त्यासाठी त्यांना सहा महिनेपर्यंत विशेष ‘श्‍वान प्रशिक्षण’ दिले जाते आणि त्यानंतर हे श्‍वान प्रशिक्षक देशभर श्‍वान प्रशिक्षक म्हणून काम करीत असतात.

हे प्रशिक्षण पूर्ण करून पूनम बाळसराफ ही विदर्भातून पहिली श्‍वान प्रशिक्षक महिला ठरली असून त्याबद्दल ‘डॉग ट्रेनिंग अकॅडमी’त झालेल्या कार्यक्रमात येरला येथील माजी पोलिस पाटील व श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य नानासाहेब पाटील यांच्या हस्ते एका कार्यक्रमात तिचा सत्कार करण्यात आला. 

‘डॉग ट्रेनिंग अकॅडमी’ उघडण्याचा मानस
श्‍वानांच्या प्रामाणिकपणाबद्दल मी अतिशय प्रभावित झाली आहे. भविष्यात नागपूरसारख्या महानगरात ‘डॉग ट्रेनिंग अकॅडमी’ उघडण्याचा मानस आहे.
- पुनम बाळसराफ,
डॉग ट्रेनर, मोर्शी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : केडीएमसीच्या निवडणुकीसाठी नऊ ठिकाणी मतमोजणी

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT