Poor people are struggling for sand and mafias trying to take it 
विदर्भ

पुरामुळे साचलेल्या वाळूवर मालकी हक्क नक्की कोणाचा? गरिबांची वानवा तर माफियांचा डल्ला 

दीपक फुलबांधे

पवनी (जि.. भंडारा)  : वैनगंगेच्या महापूरामुळे नदीकिनाऱ्यावर वाळू साचल्याने वाळवंटासारखं पठार निर्माण झालं आहे.  माफीयांकडून वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा करण्यात येत आहे. तसंच डाव्या कालव्याच्या वितरिकेजवळ वलनी रोडवर वाळूचा दुसरे वाळवंट निर्माण केले आहे. येथून होणारे वाळूचे बाजारीकरण थांबवून शासनानं घरकुलासाठी वाळू देण्याची मागणी तालुक्‍यातील घरकुल लाभार्थ्यांनी केली आहे.

पवनी तालुक्‍यात वैनगंगेची वाळू वरदान ठरत आहे. या भरवशावर अनेक व्यक्ती श्रीमंत झाले आहेत. मांगली(चौ.) हे गाव वैनगंगेच्या किनाऱ्यावर असल्याने या गावाला पुराचा फटका बसतो. 1994 नंतर पहिल्यांदा गावाला पुराचा फटका बसला. पुरात वाहून आलेली वाळू नदी किनाऱ्यालगतच्या जमिनीवर साचली आहे.

याकडे प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष असल्याने साचलेल्या वाळूच्या मालक कोण? असा प्रश्न आहे. मांगली(चौ.) येथील एका माफियाने मालगुजार असल्याच्या आविर्भावात दिवसरात्र वाळूची उचल सुरू केली आहे. मात्र, याकडे शासकीय यंत्रणेची लक्ष नाही.

पवनी तालुक्‍यातील गावागावात गरिबांना शासनाने घरकुल दिले. घराचे स्वप्न रंगविताना शासनाने दिलेला मदतीचा हात त्यांना आधार ठरत आहे. मात्र, वाळूअभावी घरकुलाचे बांधकाम रखडले असून लाभार्थ्यांना किरायाच्या घरात राहावे लागत आहे. मात्र शासनाच्या नियोजनशून्य धोरणामुळे वेळेत होणारे बांधकाम थांबले आहे. वाळूघाटांचा लिलाव झाला नसल्याने वाळू कुठून आणावी? हा पडला आहे.

शासनाकडून मिळणारी प्रती घरकुल पाच ब्रास वाळूचा प्रश्न ऐरणीवर आहे. वैनगंगेच्या पुरामुळे चार ते पाच हजार ब्रास वाळूची साठवणूक होऊन वाळवंटा सारखे पठार निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने याचे नियोजन करताना घरकुल लाभार्थ्यांसाठी विनाअट वाळू द्यावी अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांसह विविध सामाजिक संघटनेने केली आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : पुण्यात घरफोडी करणारी तरुणींची टोळी, विदर्भातून सहा जणींना घेतलं ताब्यात; VIDEO झालेला व्हायरल

Sangli Crime:'विट्यात तरुणाचा खून; दोघा हल्लेखोरांकडून धारदार शस्त्राने डोक्यात वार'; हल्लेखोर पसार, काय घडलं?

Ghulam Nabi Azad: झोपलेल्या पक्षांना विजय मिळवणे अशक्य: गुलाम नबी आझाद; काँग्रेस नेतृत्वावर साधला निशाणा

Pune Crime:'थेऊर येथील विवाह सोहळ्यात १४ लाखांच्या सोन्या-चांदीच्या दागिन्यांची चोरी'; पुणे सोलापूर रोडवरील मंगल कार्यालये बनली चोरीचे अड्डे !

बुट फेकणाऱ्या 'त्या' वकिलाला माफ का केलं? निवृत्तीपूर्वी सरन्यायाधीशांनी सांगितलं कारण...

SCROLL FOR NEXT