Prabhakarrao Vaidya's initiative to overcome Corona 
विदर्भ

'सत्ता, पैसा काहीच नको पण आपली अमरावती वाचली पाहिजे', वाचा असे कोण म्हणाले... 

सुधीर भारती

अमरावती : जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले आहे. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण वाढतच चालले आहेत. विदर्भाभोवतीही कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला आहे. त्यात अमरावती जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या कमी होण्याचं नाव घेत नाहीये. प्रशासनाकडून अनेक प्रयत्न सुरू आहेत तरीही प्रशासनाला यश येत नाहीये. म्हणूनच आता अमरावतीला कोरोनमुक्त करण्यासाठी काही भक्कम हात पुढे सरसावले आहेत. 

अमरावतीमध्ये कोरोना विषाणूंची साखळी तोडण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न होत आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, आता अमरावतीत कोरोनाला हरवण्यासाठी जगविख्यात हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने पुढाकार घेतला आहे. 

कोरोनावर मात करण्यासाठी अमरावतीकरांच्या विश्‍वासाचे केंद्र असणारे पद्मश्री प्रभाकरराव वैद्य यांनी पुढाकार घेतला आहे. आपल्या वयाचा विचार न करता तरुणांनाही लाजवेल असा लढा त्यांनी निर्धारित केला आहे. कोरोनाशी रात्रंदिवस दोन हात करणाऱ्या वॉरिअर्सच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना साथ देण्याचा त्यांचा मानस आहे. 

आपली अमरावती वाचविण्याची धडपड 

अमरावतीला कोरोनापासून वाचविण्यासाठी प्रशासकीय, राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या या संकल्पपूर्तीसाठी कंबर कसली आहे. प्रभाकरराव म्हणतात, आज प्रशासन त्यांचे काम करीत आहे, आता आपल्यालाही आपले कर्तव्य दाखविण्याची संधी आली आहे. ज्याप्रमाणे धारावीमधील नागरिकांनी आपल्या जिद्दीने कोरोनाला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, तो कौतुकास्पद आहे. असेच काहीतरी आपल्या अमरावतीत होईल का? याबाबत मी काही दिवसांपासून तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करतो आहे. 

पैसा, सत्ता, पद काहीच नको 

आम्हाला पैसा, सत्ता, पद काहीच नको, फक्त माणुसकी जिवंत राहिली पाहिजे. एकजुटीने कुठलाही धर्म, जातीभेद न करता कोरोनाशी दोन हात करणारे खंबीर वॉरिअर्स आता उभे करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. अनेक संस्था, संघटना, नगरसेवक, पदाधिकारी समोर आले आहेत. ही अमरावतीकरांसाठी भूषणावह बाब म्हटली पाहिजे, असेही प्रभाकरराव वैद्य म्हणाले. 

अमरावती पॅटर्नचे अनेक जिल्हे करतील अनुकरण 
उमरावती वाचविण्यासाठी हेल्पलाईनच्या पुढाकारातून काही नियोजन करण्यात आले आहे. त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी झाल्यास तसेच नागरिकांचा प्रामाणिक प्रतिसाद मिळाला तर 100 टक्‍के अमरावतीकर कोरोनाच्या मगरमिठीतून बाहेर पडतील. याच अमरावती पॅटर्नचे अनुकरण अन्य जिल्हेसुद्धा करतील यात शंका नाही. 
- पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, प्रधान सचिव, हव्याप्र मंडळ 

संपादित : अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest Shivaji Park : अभिजित दिपके मुंबई पोलिसांच्या रडारवर? शिवाजी पार्कवरील आंदोलन बेकायदेशीर?; CJPच्या चार पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार

Latest Marathi News Live Update : दिवसभरात काय घडलं? देशविदेशातील घडामोडी वाचा एका क्लिकवर

MPSC Student Agitation Issue : एमपीएससी आंदोलनातील फूट; शिष्टमंडळाच्या परस्पर निर्णयाने विद्यार्थ्यांमध्ये संताप

Gangapur News : गंगापूर तालुक्यात खरीप हंगामच्या पंचनाम्याला वेग; दोन दिवसात १६ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्राचा पंचनामा पूर्ण

Satara District Bank Election : भाजप, राष्ट्रवादीने वाढवले उंडाळकरांचे टेन्शन! बाळासाहेब पाटलांसह भाजपचे तीन दिग्गज मैदानात; उमेदवारीचा दावेदार कोण याचीच उत्सुकता

SCROLL FOR NEXT