mahatm gandhi.jpg 
विदर्भ

72 वर्षांपासून चालू आहे बेसन भाकरीची प्रथा

सकाळ वृत्तसेवा

गांधीग्राम (जि. अकोला) :  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अस्थीकलशाने पावन झालेल्या गांधीग्राम येथे बेसन भाकरीची परंपरा ७२ वर्षापासून सुरू असून, यंदाही राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने बुधवारी (ता.12) ला येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हे वाचा - डॉन आंबेकरच्या फेक करंसीचे अकोला कनेक्शन
पूर्णा नदीत केल्या होत्या अस्थी विसर्जीत

(12 फेब्रुवारी 1948) पासून हा कार्यक्रम नित्य नियमित करण्यात येतो, महात्मा गांधी यांची (ता.30) जानेवारी रोजी हत्या झाली होती. या घटनेनंतर (ता.12 फेब्रुवारी 1948) रोजी महात्मा गांधी यांच्या अस्थि गांधीग्राम येथील पूर्णा नदीमध्ये विसर्जित करण्यात आल्या होत्या. त्या दिवशी पाहुणे मंडळीनी सोबत बसून बेसन भाकरीचा आस्वाद घेतला होता. त्या दिवशीपासून येथील गांधी विद्यालयात नित्य नियमाने हा कार्यक्रम पाळला जातो. महात्मा गांधी यांची हत्या झाल्यानंतर ठिकठिकाणी त्यांच्या अस्थी विसर्जन करण्यात आल्या होत्या. अकोला येथील स्वातंत्र्य सेनानी ब्रिजलाल बियाणी यांनी महात्मा गांधी यांच्या अस्थि येथील पूर्णा नदीत विसर्जित करण्यासाठी आणल्या होत्या. 

क्लिक करा - मतदानाला फाटा; विषय समित्या बिनविरोधात
दरवर्षी याच तारखेला होता कार्यक्रम

गावातील ज्येष्ठ मंडळींसह पूर्णा नदी काठावर गंगा पूजन करून अस्थिचे विसर्जन करण्यात आले होते. त्यानंतर बाहेरगाववरून आलेल्या व गावातील मंडळींनी एकत्र बसून बेसन व ज्वारीच्या भाकरीचे जेवण केले होते. त्यामुळे आजही ही परंपरा अविरत पाळण्यात येते. महात्मा गांधी यांच्या कार्याची आठवण राहावी म्हणून सर्व मंडळींनी गांधीजींच्या नावावर महात्मा गांधी मेमोरिअल ट्रस्ट स्थापन केले. महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यात आले. त्याचबरोबर महात्मा गांधी यांचे विशाल स्मारक बांधण्यात आले. यासाठी अनेकांनी सहकार्य केले. म्हणून दरवर्षी (ता.12) फेब्रुवारीला शाळेमध्ये शिक्षक, विद्यार्थी, पालक व स्वातंत्र सैनिक एकत्र येऊन बेसन भाकरीचे जेवण करतात.


विविध कार्यक्रमांचे आयोजन
सकाळी गांधीजींच्या स्मारकाचे पूजन व प्रार्थना झाल्यानंतर ग्रामसफाई, 11 वाजता स्वातंत्र सेनानी यांचे स्वागत, 12 वाजता गांधींजीच्या जीवनावर भाषणाचा व गायनाचा कार्यक्रम, दुपारी एक वाजता झुणका भाकर (बेसन भाकर) सहभोजन कार्यक्रम, दुपारी चार वाजता पवित्र पूर्णा नदीवर अस्थी विसर्जन व गंगा पूजन, प्रार्थना, गीताई पठण, पाच वाजता कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant: मठात परतल्यानंतर फटाके, गर्दी अन् हॉर्नचा सामना... माधुरी पुन्हा वनतारामध्ये जाणार? PETA ची सर्वोच्च न्यायालयात याचिका!

Latest Marathi News Live Update : 'अद्वितीय धैर्याबद्दल मी त्यांना सलाम करतो'; इस्रायलच्या पंतप्रधानांकडून कॅप्टन स्मित मच्छार यांचं कौतुक

Pune ACB Trap : 'वर्दी'ला पुन्हा कलंक! शिरूरमध्ये 95 हजारांची लाच घेताना हवालदार जाळ्यात; गुन्ह्यात अटक न करण्यासाठी मागत होता 1 लाख

IND vs SL Semi Final : भारताला दिवसा 'चांदण्या' दिसल्या! ९ फलंदाज घेऊन उतरले, पण इशान किशन, वैभव सूर्यवंशीमुळे वाचली लाज

'आपको बाहर जाना पड़ेगा...' मुश्ताक खान यांच्या शोकसभेतून राजपाल यादवांना हकललं? Viral Video

SCROLL FOR NEXT