विदर्भ

भंडारा, गोंदियात पावसाची हजेरी; वीज पडून दोन बैलांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

वरठी (जि. भंडारा) : जवळच्या सिरसी येथे बुधवारी दुपारी वीज पडल्याने झाडाखाली बांधलेल्या दोन बैलांचा मृत्यू (Death of two bulls) झाला. यामुळे ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकरी फुलचंद साठवणे यांचे मोठे नुकसान झाले आहे. (Presence of rain with thunder in Bhandara and Gondia)

सिरसी येथे गांधी वॉर्डमधील फुलचंद सकाराम साठवणे यांनी शेतावरील काम आटोपल्यावर बैलांना घरामागे असलेल्या झाडाखाली चारा टाकून बांधून ठेवले होते. दुपारी १२ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. सव्वाबाराच्या सुमारास विजेच्या गडगडाटासह त्यांच्या घरामागील झाडावर वीज कोसळली. यात त्यांच्या दोन बैलांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती वरठी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दुपारी तीन वाजता भंडारा येथील पशुवैद्यकीय अधिकारी सपाटे यांनी घटनास्थळाला भेट दिली. या घटनेमुळे शेतकऱ्यावर आर्थिक संकट आले असून त्याला तत्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

उष्णतेच्या प्रमाणात घट

भंडारा व गोंदिया शहरासह जिल्ह्यांतील काही तालुक्‍यांत मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. भंडारा शहरात बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी १२ वाजताच्या सुमारास भंडारा शहरात जोरदार मेघगर्जना व वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. सुमारे एक तासापर्यंत कमीअधिक प्रमाणात आलेल्या पावसामुळे उष्णतेच्या प्रमाणात घट आली आहे. त्यानंतर सायंकाळपर्यंत ढगाळ वातावरण आहे.

छत कोसळल्याने वाहतूक विस्कळीत

गोंदिया शहरात सकाळपासून आकाश निरभ्र असताना दुपारी वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जागोजागी पाणी साचून होते. तालुक्‍यातील बरबसपुरा व परिसरात वादळासह पाऊस झाला. बरबसपुरा येथील भाऊलाल पटले यांच्या घरावरचे छत उडून रस्त्यावर आले होते. त्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. आमगाव तालुक्‍यातही वादळवाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वीज प्रवाह खंडित झाला होता. अन्य तालुक्‍यात ढगाळ वातावरण कायम होते.

(Presence of rain with thunder in Bhandara and Gondia)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT