PM Narendra Modi Wardha
PM Narendra Modi Wardha esakal
विदर्भ

PM Narendra Modi Wardha: १० वर्षात २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं, PM मोदी वर्ध्यात काय म्हणाले?

Sandip Kapde

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामदास तडस आणि अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी वर्धा येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली होती. वर्धा ही संतांची भूमी असल्याचे मोदी म्हणाले. मी भाग्यशाली आहे, मला वर्ध्यात यायला मिळाले,असं देखील मोदी म्हणाले. PM Narendra Modi Wardha

जय गुरु म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले. अमरावती आणि वर्ध्याशी माझं जवळचं नातं आहे. कारण माझा जन्म गुजरातमध्ये झाला. २०२४ ची निवडणूक विकासासाठी आहे. विकसीत भारताचे स्वप्न महात्मा गांधी यांनी पाहिलं होतं. देशाच्या निर्णायक क्षणी वर्ध्याचे आशीर्वाद पाहिजेत, विकसित भारत महाराष्ट्राचं लक्ष दुर नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

१० वर्षात आम्ही २५ कोटी लोकांना आम्ही गरिबीतून बाहेर काढले आहे. ११ कोटी लोकांना पाण्याचे कनेक्शन दिले. ४ कोटी लोकांना पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळाला. ५० कोटीहून अधिक लोकांना बँकेशी जोडण्यात आले. प्रत्येक गावात वीज पोहचवण्याचं काम केलं. २०१४ आधी देशात नैराश्याचे वातावरण होते, असे मोदी म्हणाले.

ज्यांना कोणी विचारलं नाही. त्यांना या गरिबाच्या मुलाने पुजलं आहे. गॅरंटी साठी हिंमत लागते. पुढील पाच वर्षात ३ कोटी नवीन घरं हे आमच्या जाहीरनाम्यात आहे. गॅरंटी हा फक्त शब्द नाही तर प्रत्येक क्षणासाठी केलेले प्रयत्न आहेत. ७० वर्षावरील लोकांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळणार, कितीही अडचणी आल्या तर गॅरंटी पूर्ण करणार, असे आश्वासन मोदींनी दिले.

गावागावातील मुलींना ड्रोन पायलट करणार आहोत. ३ कोटी महिलांना लखपती दिदी करणार, बारशाले गेला अन् बाराव्याला आला, काँग्रेसच्या या धोरणामुळे शेतकरी मागास आहेत, अशी टीका देखील मोदी यांनी काँग्रेसवर केली.

आमचं विदर्भाच्या विकासावर बारीक लक्ष आहे. काँग्रेस काळात विदर्भ मागास होता. आता रस्ते आणि रेल्वेचं जाळ विदर्भात असल्याचे मोदी म्हणाले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sonia Gandhi : ''माझं लेकरु तुम्हाला सोपवत आहे... तो तुम्हाला निराश करणार नाही'', सोनिया गांधी भावुक

Parveen Hooda : ऑलिम्पिकपूर्वी भारताला मोठा धक्का; परवीन हुड्डा ऑलिम्पिक कोटा गमावणार?

Arvind Kejriwal: ईडीच्या कारवाईबाबत केजरीवालांचं पुढे काय होणार? सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला निकाल

Shashank & Gashmeer : शशांक-गश्मीरची पुन्हा जमली जोडी; 'या' प्रोजेक्टमध्ये करणार एकत्र काम

Latest Marathi News Live Update : रायबरेलीतील सभेत बोलताना सोनिया गांधी भावुक

SCROLL FOR NEXT