prisoner ran away Covid hospital in Amaravati  
विदर्भ

धक्कादायक! जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कैदी कोविड रुग्णालयातून पसार; शोधाशोध सुरु

संतोष ताकपिरे

अमरावती ः खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा उपभोगणारा बंदी कुणाचेही लक्ष नसल्याचे बघून संदर्भसेवा रुग्णालयाच्या कोविड रुग्णालयातून पसार झाला. पसार बंदीच्या शोधासाठी पोलिसांची गुरुवारपासून धावपळ सुरू आहे.

पसार बंदी यवतमाळ येथील रहिमनगरचा रहिवासी आहे, असे गाडगेनगर पोलिसांनी सांगितले. शेख सलमान शेख अहमद (वय 26) असे पसार बंदीचे नाव आहे. सदर व्यक्तीविरुद्ध यवतमाळ येथे खुनाचा गुन्हा दाखल होता. त्यात तेथील न्यायालयाने त्याला 27 डिसेंबर 2020 रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्यानंतर यवतमाळ कारागृहामधून शेख सलमान या बंदीस अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात पाठविले. 

बाहेरून आलेला सिद्धदोष किंवा न्यायाधीन बंदी यापैकी कुणीही असला तरी अशा व्यक्तीला आधी अंधविद्यालयाच्या इमारतीत असलेल्या तात्पुरत्या कारागृहात ठेवले जाते. कोविड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना कारागृहाच्या मुख्य इमारतीमध्ये आणल्या जाते. शेख सलमान या बंदीलाही 27 डिसेंबर 2020 रोजी तात्पुरत्या कारागृहात ठेवले. तेथून कोरोना चाचणीसाठी 20 जानेवारी 2021 रोजी पोलिसांनी त्याला कोविड रुग्णालयात दाखल केले. 

सदर बंदीवर कोविड रुग्णालयात पोलिसांच्या उपस्थितीत उपचार सुरू होते. गुरुवारी (ता. 28) सकाळी नऊ ते दहाच्या सुमारास कुणाचे लक्ष नसल्याचे बघून त्याने तेथून पळ काढला. गाडगेनगर पोलिसांना त्यासंदर्भात घटनेची माहिती देण्यात आली.

शेख सलमान हा बंदी कारागृहाच्या नव्हे तर पोलिसांच्या देखरेखीत कोविड रुग्णालयात उपचार घेत होता.
-रमेश कांबळे, 
अधीक्षक, मध्यवर्ती कारागृह, अमरावती.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT