Problem due to over internet usage in lockdown 
विदर्भ

रिकामटेकड्यांचा वेळ जातोय सोशल मीडियावर अन्‌ वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांना बसतोय फटका

सूरज पाटील

यवतमाळ : कोरोना विषाणूचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. या विषाणूने अवघे जग आपल्या कवेत घेतले. गोरगरिबांचे दोन वेळच्या जेवणासाठी हाल सुरू आहे. संपूर्ण यंत्रणा मानव प्राणी जगावा यासाठी राबत आहे. दुसरीकडे नेटकऱ्यांना अजूनही आजाराचे गांभीर्य कळल्याचे दिसत नाही. त्यांनी समाजमाध्यमाचा बेछूट वापर करीत कोरोनाला मनोरंजनाचा विषय केला आहे. 

कोरोना नावाच्या शत्रूला पराभूत करण्यासाठी प्रशासन जंगजंग पछाडत आहे. दिवसरात्र लढाई सुरू आहे. अशा संकट समयी जनतेला सुखरूप राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर पडण्यास मज्जाव देखील करण्यात येत आहे. आजाराच्या गांभीर्यामुळे जीवनावश्‍यक वस्तू घरपोच पोहोचवून दिल्या जात आहे. ज्यांचे पोट भरले आहे, अशांना कशाचेही मोल दिसत नाही. सरकारी सुट्ट्यांप्रमाणे नुसती मौज मजा सुरू आहे. ती देखील समाज माध्यमाच्या माध्यमातून.

आपण कोणता संदेश कुणाला आणि कशाला पाठवतो, याचे भान दिसत नाही. आला संदेश दे पाठवून. कोरोनाच्या जनजागृती बाबत काही चांगले संदेश येत आहेत. त्याचे वाचन खरंच होतेय काय, हा प्रश्‍न आहे. एकाच ग्रुपवर एकच संदेश आलटून पालटून व्हायरल होत आहे. कोरोना आजाराची मस्करी करणारे मनोरंजक किस्सेही शेकडोंच्या घरात आहे. दिवसभर केवळ मनोरंजन म्हणून नेटचा अतिरिक्त वापर वाढत चालला आहे. त्यावर कोणतेही निर्बंध नाहीत. त्याचा फटका मात्र, अत्यावश्‍यक गरज असणाऱ्यांना बसत आहे. 

अत्यावश्‍यक सेवेतील कुटुंबीय चिंतीत

अत्यावश्‍यक सेवेत आरोग्य, पोलिस, महसूल, वीज वितरण आदी विभागातील कर्मचारी कर्तव्य बजावत आहेत. पोलिस आणि वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्‍टरांसाठी दिवस काय आणि रात्र काय एकच झाली आहे. अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या घरातील वातावरण मन सुन्न करणारे आहे. किमान त्याकडे बघून तरी बिनधास्त लोकांनी कोरोनाबाबत गंभीर होणे आवश्‍यक आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shambhuraj Desai : मंत्री शंभुराज देसाईंचे थेट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनाच आव्हान... म्हणाले,

IND vs ENG 3rd Test: जसप्रीत बुमराहच्या ५ विकेट्सने दिले हादरे! कपिल देवसह अनेकांचे विक्रम मोडले; पण इंग्लंडचे शेपूट पुन्हा वळवळले

Latest Marathi News Updates: खडकवासला धरण परिसरात प्रेमी युगलाने दिला जीव

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

मॅरेज मटेरियल असतात या राशीच्या व्यक्ती ; लग्नानंतर उजळेल जोडीदाराचं भाग्य, संसारही होईल सुखाचा

SCROLL FOR NEXT