विदर्भ

वर्ध्यात उद्यापासून होणार रेमडेसिव्हीरचे उत्पादन; पहिल्या खेपेत 25 हजार इंजेक्‍शन्स

रूपेश खैरी

वर्धा : कोरोना काळात उपचाराकरिता रेमडेसिव्हीर (Remdesivir) इंजेक्‍शन महत्त्वाचे मानले जात आहे. यामुळे त्याची मागणी वाढली आहे. या मागणीच्या तुलनेत सध्या उत्पादन कमी आहे. यामुळे त्याचे उत्पादन वर्ध्यात (Remdesivir production in Wardha) करणार येणार आहे. हे उत्पादन उद्यापासून सुरू होणार असून पहिल्या खेपेत 25 हजार इंजेक्‍शन तयार करण्यात येणार आहे. (Production of Remdesivir injections will done from tomorrow in Wardha)

केंद्र शासनाने दिलेल्या परवानगीनुसार सेवाग्राम येथील जेनेटिक लाईफ सायन्सेस आणि हैद्राबाद येथील हेक्‍ट्रा या दोन कंपनीच्या मदतीने हे काम सुरू आहे. 25 हजार इंजेक्‍शन निर्माण करण्याकरिता आवश्‍यक असलेले कच्चे साहित्य उपलब्ध झाले आहे. त्यानुसार हे काम करण्यात येणार आहे. या कामाकरिता तांत्रिक आणि इतर सर्व संवर्गातील एकूण शंभर कामगार कार्यरत राहणार आहे.

सतत काम करणाऱ्या या कामगारांच्या परीश्रमातून हे इंजेक्‍शन निर्माण करण्यात येणार आहे. ते केंद्राच्या स्वाधीन करण्यात येणार असून त्यांच्याकडून गरजेनुसार ते राज्यातील जिल्ह्यांना देण्यात येणार आहे. 25 हजाराच्या खेपेनंतर उत्पादन वाढवून ते 30 हजारांवर नेण्याचा प्रयत्न आहे. पहिले 25 हजार इंजेक्‍शन 15 मे पर्यंत तयार करण्याचा मानस असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

महाराष्ट्राला प्राथमिकतेचा प्रयत्न

सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती विदारक आहे. या काळात कोरोनाबाधितांना औषधोपचार महत्त्वाचा आहे. यात रेमडेसिव्हीर इंजेक्‍शन अत्यावश्‍यक झाले आहे. यामुळे त्याची सर्वत्र टंचाई निर्माण झाली आहे. याच कारणाने वर्ध्यात त्याची निर्मिती करण्याचा निर्णय झाला. या निर्णयानुसार उत्पादन सुरू झाले. ते लवकरच केंद्राच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. असे असले तरी त्याचा महाराष्ट्राला सर्वाधिक उपयोग होईल असा प्रयत्न आहे.

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी येणार

या कंपनीत काम सुरू होणार आहे. यामुळे तिची निवड करण्याकरिता प्रयत्न करणारे केंद्रियमंत्री नितीन गडकरी हे गुरुवारी (ता. सहा) येथे येणार आहेत. त्यांच्या हस्ते या कामाचे उद्‌घाटन होणार असल्याचे बोलले जात आहे.

केंद्राच्या परवानगीअंती गरजेनुसार आवश्‍यक कच्चा माल आणि साहित्य उपलब्ध झाले आहे. त्यातून हे इंजेक्‍शन बनविण्याचा प्रयत्न आहे. या कामाला उद्यापासून प्रारंभ होणार आहे. येत्या 15 तारखेपर्यंत 25 हजारांची पहिली खेप देण्याचा प्रयत्न आहे. यानंतर उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. महेंद्र क्षीरसागर, संचालक जेनेटिक सायन्सेस वर्धा

(Production of Remdesivir injections will done from tomorrow in Wardha)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT