Professor who was missing from last 2 days found dead in Amravati  
विदर्भ

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या प्राध्यापकाचा लागला शोध; पण अवस्था बघून सरकली पायाखालची जमीन  

संतोष ताकपिरे

अमरावती ः शहरातील रहाटगावच्या गुरुकृपा कॉलनी येथील रहिवासी तुषार विलास कदम (वय 32) या युवा प्राध्यापकाचा मृतदेह छत्रीतलाव परिसरात आढळला. तुषार हे दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता झाले होते.

तुषार हे जिल्ह्यातील एका महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. 25 फेब्रुवारी 2021 पासून तुषार हे दुचाकी घेऊन घरून निघून गेले होते. त्याच दिवशी त्यांची दुचाकी छत्रीतलाव परिसरातील विहिरीजवळ बेवारस आढळली. ती दुचाकी पोलिसांनी जप्त केली. दुचाकी क्रमांकाच्या आधारे पोलिस नातेवाइकांपर्यंत पोहोचले. 

शनिवारी (ता. 27) सायंकाळी पावणेसात ते सातच्या सुमारास मृतदेह तलावाच्या काठावर आढळला. पोलिसांनी नातेवाइकांना माहिती दिली. घटनास्थळी पाहणी केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली. राजापेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यू, अशी नोंद घेतली. 

घटनेच्या दिवशी बेपत्ता झाल्यानंतर नातेवाइकांसह मित्रपरिवाराने त्यांचा आसपास शोध घेतला. परंतु ते आढळून आले नाहीत. युवा प्राध्यापकाच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही, असे राजापेठ पोलिसांनी स्पष्ट केले. रविवारी (ता. 28) उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. 

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Cabinet: महावितरणचे विभाजन होणार; देशातील पहिले AI आयुक्तालय महाराष्ट्रात बांधणार, महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

Amazon Layoffs : मे महिन्यात 14,000 कर्मचाऱ्यांची कपात! 3 महिन्यांत पुन्हा नोकरकपात; AI मुळे नोकऱ्यांवर संकट?

Latest Marathi News Live Update: MPSC चा निकाल जाहीर, सोलापूरचा विजय राज्यात पहिला

निर्मिती सावंत आता होणार ‘भागूबाई’! सगळ्या गावाची खबर ठेवणाऱ्या व्यक्तिरेखेचा धमाकेदार पोस्टर रिलीज.

Sunetra Pawar Devendra Fadnavis Meeting : सुनेत्रा पवार, पार्थ पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला; बारामती पोटनिवडणुकीत भाजपची यंत्रणा सक्रीय

SCROLL FOR NEXT