yavatmal e sakal
विदर्भ

यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : महागाव (mahagaon yavatmal) तालुक्यातील अमडापूर प्रकल्पात (amdapur project yavatmal) पुनवर्सन मोबदल्याच्या प्रतिक्षेत आहे. या मागणीसाठी सोमवारपासून स्थानिक आझाद मैदान येथे उपोषण सुरू आहे. मोबदला देण्याबाबत निर्णय न झाल्याने गुरुवारी (ता.12) कैलास दशरथ डुकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.

उमरखेड तालुक्यातील अमडापूर येथे 2005 मध्ये अमडापूर धरण बांधण्यात आले. 1994 पासून सुरुवात झालेल्या धरणाचे काम 2005 मध्ये पूर्ण झाले. या प्रकल्पात कुरळी येथील नागरिकांची घरे व शेतजमीन संपादीत करण्यात आली. त्यांना शेतीचा मोबदला अत्यल्प मिळाला. कुरळी येथील 340 कुटुंबांच्या पुनवर्सनासाठी महागाव येथे 12 हेक्टर जमीन उपलब्ध करून दिली होती. परंतु, 24 हेक्टर जमिनीची गरज होती. त्यामुळे पुनवर्सवनाचा प्रस्ताव बारगळला. पुनवर्सनासाठी खर्च भरपूर येणार असल्याने शासनाने स्वेच्छा पुनर्वसनाचा प्रस्ताव लघु पाटबंधारे विभाग पुसद येथील अधिकार्‍यांनी 2019 मध्ये प्रकल्पग्रस्तांसमोर ठेवला. प्रकल्पाग्रस्तांनी स्वेच्छा पुनवर्सनासाठी मान्यता दिली. परंतु, ठराविक कालावधीत पुनर्वसन करण्यात आले नाही. पुनवर्सन न केल्यामुळे कालपासून पुन्हा अमडापूर प्रकल्पातील कुरळी येथील नागरिकांना उपोषणास बसावे लागले आहे. यातील उपोषणकर्ते शेतकरी कैलास दशरथ डुकरे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात साडेअकराच्या सुमारास अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. सोबत सहकारी तसेच पोलिस असल्याने मोठा अनर्थ ठळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लायब्ररीच्या वॉशरूममध्ये भिंतीला छिद्र, मोबाइल कॅमेरा लावून विद्यार्थिनींचे व्हिडिओ अन्...; मालकाच्या मुलाचं विकृत कृत्य

Dilip Walse Pati: अंगणवाडीच्या पोषण आहारावर गंभीर प्रश्न! दर्जाची निष्पक्ष चौकशी करा, दोषींवर कारवाई करा; वळसे-पाटील आक्रमक

Latur Crime: चाकूरमध्ये पहाटे महिलेच्या गळ्यातील दागिने हिसकावले; चाकूचा धाक दाखवत १ लाख ३० हजारांचा ऐवज लंपास

‘फुलों का तारों का…’ गाणं आठवतं? रक्षाबंधनाच्या दिवशी हमखास ऐकलं जातं, पण हे गाणं कोणी लिहिलं?

PUC Fee Hike: वाहनचालकांना मोठा झटका! महाराष्ट्रात PUC तपासणीचे दर वाढले, आता किती पैसे मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT