block-caller- 
विदर्भ

जवळच्या मित्रानेच टाकला तिचा नंबर एका गृपवर आणि तिला येऊ लागले नकोसे फोन! मग काय झाले वाचा...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : मैत्री करताना खूप विचारपूर्वक केली पाहिजे आणि एखादयाला आपला नंबर देतानाही खूप विचारपूर्वकच दिला पाहिजे याचे प्रत्यंतर नुकतेच एका मुलीला आले.
एका सुशिक्षित तरुणाशी तिची मैत्री झाली. तिने विश्वासाने आपला मोबाईल नंबर त्याला दिला, मात्र त्याने त्याचा नको तसा उपयोग तेला.
 त्याने युवतीचा नंबर एका अश्लील गृपवर टाकला. त्या युवतीला काही लोकांचे फोन सुरु झाले. विविध प्रकारचे घाणेरडे कॉमेंट ऐकून ती बेजार झाली. अखेर तिने पोलिस ठाणे गाठले. चार दिवसांच्या तपासानंतर पोलिसांनी त्याचा शोध लावला.
संबंधित युवकाने जिल्ह्यातील एका महाविद्यालयातून नुकतीच अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली आहे.  तो स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होता. शहरातील एक उच्चशिक्षित युवती त्याची चांगली मैत्रीण होती. हा युवक एका अश्लील ग्रुपचा सदस्य होता. त्याने शहरातील त्याच्या मैत्रिणीचा मोबाईल नंबर प्राप्त केला. ज्या युवतीचा हा मोबाईल नंबर होता, त्याने तिचे नाव बदलून तो नंबर अश्लील ग्रुपवर टाकला. त्यामुळे त्या युवतीचा काही एक संपर्क नसताना तिला काही दिवसांपासून त्या नंबरवर अनोळखी व्यक्तींचे फोन यायला लागले. तिला अश्लील कमेंट्स पाठविण्यात आल्या. त्यामुळे आश्चर्याचा धक्का बसलेल्या त्या युवतीने गाडगेनगर ठाण्यात तक्रार केली. चार दिवसांपूर्वी विनयभंग व सोशल मीडियावरून बदनामी केल्याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सायबर पोलिसांच्या मदतीने गाडगेनगर पोलिसांनी त्या युवकाचा पत्ता प्राप्त केला. ठाण्यातील डी. बी. स्कॉडचे एक पथक नांदगावखंडेश्वर येथे पोचले व त्यांनी त्या युवकाला हुडकून काढले. सहायक पोलिस निरीक्षक पूजा खांडेकर याप्रकरणाचा तपास करीत आहेत.

सविस्तर वाचा - वेळ रात्री अकराची...युवतीसोबत रस्त्यावर बोलत होता पोलिस कर्मचारी...मग काय झाले वाचा...
चौकशीअंती अटक
 उच्चशिक्षित युवकाने याप्रकरणाची कबुली दिली. त्याचा मोबाईल जप्त केला असून, चौकशी सुरू आहे.
मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

MPSC Student Agitation : अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आंदोलक ठाम; विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND A vs AUS A, 1st ODI: पाटीदार लढला, पण बाकी सारे ढेपाळले; भारताचा संघ १४९ वर ऑलआऊट, ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

SCROLL FOR NEXT