Rabi sowing area increased by thirty thousand hectares in Yavatmal 
विदर्भ

रब्बी पेरणी क्षेत्रात तीस हजार हेक्‍टरने वाढ; दोन लाख हेक्‍टरवर नियोजन

सूरज पाटील

यवतमाळ : खरीप हंगामात समाधानकारक पाऊस झाला आहे. प्रकल्पातही मोठ्या प्रमाणात जलसाठा आहे. त्यामुळे यंदा रब्बीचे पेरणी क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी एक लाख ६९ हजार हेक्‍टरवर पेरणी झाली होती. यंदा दोन लाख हेक्‍टरवर पेरणीचा अंदाज आहे.

पावसाने सुरुवातीला उघडझाप घेतली. त्यामुळे पाऊस होणार की नाही, अशी भीती शेतकऱ्यांना होती. मात्र, यंदा दमदार पाऊस झाला. सरासरीच्या तुलनेत चांगला पाऊस झाल्याने जिल्ह्यातील प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. जमिनीतही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे. पावसामुळे सोयाबीन तर काही भागात कपाशीला फटका बसला आहे. त्यामुळे खरिपातील नुकसान रब्बीत भरून काढण्याचे नियोजन शेतकऱ्यांचे आहे.

यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र एक लाख ३२ हजार ३१६ हेक्‍टर आहे. गेल्या वर्षी एक लाख ६९ हजार ६४३ हेक्‍टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरणी झाली होती. यंदा यात वाढ होण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे. यामध्ये मुख्य पीक असलेल्या ज्वारी, गहू, हरभरा या पिकांच्या मोठ्या क्षेत्रावर पेरण्या होणार आहे.

अडीच हजार हेक्‍टरवर रब्बी ज्वारी, ६० हजार हेक्‍टरवर गहू तर एक लाख २९ हजार हेक्‍टरवर हरभरा पिकांचा पेरा होण्याची शक्‍यता आहे. याशिवाय, करडई, जवस, तीळ, सूर्यफुल, सहा हजार हेक्‍टरवर भाजीपाला व इतर पिकांची पेरणी होण्याचा अंदाज आहे. बियाणे कमी पडू नये यासाठी तजवीज करण्यात आली आहे. रब्बीसाठी एक लाख ५४ हजार ६०० क्विंटल बियाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ५६ हजार क्विंटल सार्वजनिक तर ९८ हजार क्विंटल बियाणे खासगीकडून नियोजन केले आहे.

पीक प्रस्तावित पेरणी क्षेत्र
रब्बी ज्वारी २,२९९
गहू ६०,९२६
मका १,१६०
हरभरा १,२९,०४२
करडई ७३
सूर्यफुल २१
तीळ ९८
इतर ६,६५१

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bharat Gogawale on Manoj Jarange Patil : "कोणी ऐऱ्यागैऱ्याने त्याचे श्रेय घेऊन ठाण्याला आव्हान देऊ नये,”, भरत गोगावलेंचे मनोज जरांगेंवर थेट आरोप

Fertilizer Allocation System : आधार, सातबारा अन् पिकानुसार ठरणार खतांचा कोटा ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली; वाळवा पंचायत समितीत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण

Asian Games 2026: दीपिका सेहरावतचे रेकॉर्ड ब्रेकिंग गोल! थायलंडवर २०-१ असा दणदणीत विजय; १९८२ नंतर सुवर्णपदकाच्या शोधात

Marathi News Live Updates : पक्ष फोडणाऱ्या टोळीचे मुख्य सूत्रधार ज्ञानेश कुमारच, त्यांचा तातडीने राजीनामा घ्या; उद्धव ठाकरे आक्रमक

Uddhav Thackeray Eknath Shinde : वसंत डावखरे मानहानी प्रकरणाचा १७ वर्षांनी निकाल; उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंबाबत कल्याण न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

SCROLL FOR NEXT