Rahul Gandhi defamed by BJP 
विदर्भ

अशोक चव्हाण म्हणतात, राहुल गांधींची भाजपकडून बदनामी 

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भाजपशासीत राज्यांमधील महिलांवर अत्याचार वाढले आहेत. विशेष म्हणजे महिला अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये भाजप नेते गुंतलेले असून, त्यांच्यावर कुठलीच कारवाई होताना दिसत नाही. याविरोधात कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी मोर्चा उघडला आहे. भाजपकडे उत्तर नसल्याने खासदार राहुल गांधी यांची नाहक बदनामी करून देशाचे लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न भाजपकडून चालविल्यात येत असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. 

1971च्या युद्धात आजच्याच दिवशी म्हणजे 16 डिसेंबर रोजी भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे करून बांग्लादेशाची निर्मिती केली होती. या ऐतिहासिक दिवशी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वाचे आणि भारतीय सैन्याने गाजवलेल्या अतुलनीय शौर्याचे स्मरण करण्याऐवजी भारतीय जनता पक्षाने निरर्थक घोषणाबाजी करून राजकारण करण्याचा प्रयत्न केला, असे विधानसभेमध्ये सोमवारी झालेल्या गोंधळाच्या अनुषंगाने भाजपवर सडकून टीका करताना अशोक चव्हाण म्हणाले. 

भाजपकडून महापुरुषांचा वापर

महापुरुषांच्या नावाखाली केवळ राजकारण करण्याची भाजपची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही भाजपने अनेक महापुरुषांचा आपल्या सोयीने राजकीय वापर करून घेतला आहे. काही महापुरुषांमध्ये वाद होते, असे खोटे चित्र उभे करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात येत आहे. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू व सरदार पटेल, महात्मा गांधी आणि शहीद भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस अशा महापुरुषांमध्ये नेहमीच वाद असल्याचा अपप्रचार केला आहे. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणूनच आज भाजपने विधानसभेत गोंधळ घातला, असे अशोक चव्हाण म्हणाले. 

कॉंग्रेसने नेहमीच चोख प्रत्युत्तर देईल

राहुल गांधी यांनी झारखंडमधील एका जाहीर सभेत केलेला सावरकरांचा उल्लेख वेगळ्या संदर्भाने होता. त्यांनी देशातील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या अनुषंगाने उचललेल्या मुद्यांना उत्तर देता येत नसल्याने भाजपने जाणीपूर्वक नवा वाद उभा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आमदार अशोक चव्हाण यांनी केला. भाजपच्या या कारस्थानाला कॉंग्रेसने नेहमीच चोख प्रत्युत्तर देईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बातम्या पेरून मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आलेला, आता घोटाळ्यातून वाचण्यासाठी माझ्याबद्दल खोटं पसरवतोय; धंगेकरांची आणखी एक पोस्ट

IND vs AUS, 2nd ODI: भारतीय संघाने सलग १७ वा टॉस हरला; प्लेइंग-11 मध्ये कुलदीपला संधी नाहीच, जाणून घ्या कसे आहेत दोन्ही संघ

Baby Care After Diwali: दिवाळीनंतर लहान बाळांची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या काही खास सोप्या टिप्स!

रितेश जेनिलियाची यंदाची दिवाळी लातूरमध्ये नाहीतर मुंबईत, नवऱ्याने मुलासोबत स्वत: केल बायकोचं औक्षण

Panchang 24 October 2025: दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्र पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT