The rain is back in state after three weeks
The rain is back in state after three weeks 
विदर्भ

तीन आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर पावसाचे आगमन; शेतकरी सुखावला

सकाळवृत्तसेवा

नांदुरा - नांदुरा तालुक्यात तीन आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्ग सुखावला असला तरी ही पावसाची दडी खरीप पिकाच्या उत्पन्नवाढीवर वरवंटा फिरवून गेली आहे. मूग, उडीद व सोयाबीन ही पिके ऐन फुलावस्थेत तर मका कणीस फेकण्याच्या अवस्थेत असतांना पाऊस गायब झाल्याने या पिकांचे उत्पन्न हातचे वाया गेले आहे.

मागील वर्षी कॉटनबेल्टची किनार लाभलेल्या या परिसरात गुलाबी बोंडअळीने धुमाकूळ केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला मोर्चा सोयाबीन, मका, उडीद व मूग पिकाकडे वळवला असतांनाच पावसाने उघडीप दिल्याने यावर्षी पण शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीच्या आशा धुळीस मिळाल्या आहे. सध्या दि. 16 चे सकाळी 7 वाजल्यापासून तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस होत आहे. खरीप पीक तर हातचे गेले असून रब्बीच्या पिकांना तरी याचा फायदा व्हावा. यासाठी जास्त पावसाच्या प्रतीक्षेत सध्या शेतकरी आहे.

तालुक्यात दि. 16 ला सकाळपासून बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. हाच पाऊस 8 ते 10 दिवसापूर्वी पडला असता तर अनेक खरिपाची पिके हातची गेली नसती. सध्या सोयाबीन, उडीद व मूग तसेच मका पिके उत्पन्नवाढीतून बाद झाली आहेत. 'देर आया दुरुस्त आया' उक्तीप्रमाणे रब्बीच्या पिकाला तरी फायदा व्हावा असा पाऊस होणे अपेक्षित आहे. - विशाल भाकरे, शेतकरी, कंडारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parveen Shaikh: इस्रायल-हमास युद्धावर पोस्ट केल्याने प्रिन्सिपलला राजीनाम्याचे आदेश, पालकांनी उचलले महत्त्वाचे पाऊल

नेत्याचे एका दिवसात दोन पक्षप्रवेश, आधी शिंदे गटात मग ठाकरे गटात; काय आहे प्रकरण?

CSK प्लेऑफच्या शर्यतीत फसली! विजयासह पंजाब किंग्सचे आव्हान कायम; चेन्नईचा पाचवा पराभव

Eknath Shinde: ठाण्याचे किल्लेदार शिंदेच; मतदारसंघ खेचून घेतलाच, ठाकरेंशी होणार थेट लढत

Latest Marathi News Live Update : पुढील 24 तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT