file photo 
विदर्भ

अवकाळी व गारपिटीमुळे होळी होणार थंडी...हवामान खात्याने वर्तविला हा अंदाज

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातील सुरुवातीच्या दिवसांत पारा वर चढत असताना आता अवकाळी पाऊस माघारी फिरेल, असे जिल्हावासींना वाटत होते. परंतु, हा अंदाज खोटा ठरला आहे.

दररोज सकाळी ऊन तापत असते. सायंकाळी ढगाळ वातावरणनिर्मिती होऊन कुठे ना कुठे पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हवामान खात्याने 5 व 6 मार्च रोजी जिल्ह्याच्या बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगटासह पाऊस पडेल, असे संकेत दिले होते. त्यानुसार, 6 मार्च रोजी सकाळपासून दुपारी तीननंतर वातावरणात अचानक बदल घडून आला.

ढगांचा गडगटाट, वादळीवारा सुटला. सालेकसा, गोंदिया, आमगाव व गोरेगाव तालुक्‍यात पावसाने तुरळक हजेरी लावली. सडक अर्जुनी तालुक्‍यात मात्र गारपिटीसह दमदार पाऊस झाला. या तालुक्‍यातील डव्वा परिसराला पावसाने अक्षरशः घेरले होते.

गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल

दरम्यान, आज, शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण असताना रात्री उशिरार्यंत जिल्ह्याच्या बहुतांश भागांत गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल, असे संकेत हवामान खात्याने दिले आहेत. शिवाय 9 व 10 मार्चलाही गारपिटीसह पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे होळी आणि धुलीवंदनाच्या सणावर पावसाचे सावट कायम आहे.

भाजीपाला, कडधान्ययुक्त पिकांना फटका

अवकाळी पावसामुळे भाजीपाला व कडधान्ययुक्त पिकाला जबरदस्त फटका बसला आहे. या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली असून, उत्पादन अर्ध्यावर येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे प्रशासनाने पिकांचे सर्वेक्षण करावे व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आरोग्यावरही होणार परिणाम

वातावरणातील बदलाचा लहान मुले व वृद्धांच्या प्रकृतीवर परिणाम झाला आहे. सर्दी, ताप, खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, शासकीय रुग्णालयाचा बाह्य विभाग रुग्णांच्या गर्दीने दररोज भरलेला दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हॉटेल-ढाब्यांसाठी नवा स्वयंपाकाचा पर्याय! मुंबईत ‘देश का इंधन’ बायोफ्यूल कोल प्रणालीची एंट्री; नवे तंत्रज्ञान नेमकं आहे तरी कसं?

Haveli News : हवेली तालुक्यात गॅस बुकिंगवरील ग्रामीण-शहरी भेदाविरुद्ध संताप; २५ दिवसांचा नियम लागू करण्याची मागणी

Gold Price Target 2026: सोनं दीड लाखांच्या खाली! १ लाख ४० हजारांपर्यंत येण्याची दाट शक्यता; तज्ज्ञ काय सांगतात? खरेदीची योग्य वेळ कोणती?

VIRAL VIDEO : खासदार उदयनराजेंनी ज्याचं कौतुक केलं, तो पोलिस अधिकारी नेमका आहे तरी कोण? इन्स्पेक्टरच्या अनोख्या एन्ट्रीने साताऱ्यात जोरदार चर्चा!

Latest Marathi News Live Update : दादरमध्ये मनसे कार्यकर्ते दाखल होण्यास सुरुवात

SCROLL FOR NEXT