Vidarbha Rain Update Sakal
विदर्भ

Vidarbha Rain : सकाळीच पावसाचं आगमन, गारपिटीमुळं पिकांचं नुकसान

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाने विदर्भात जोरदार (Vidarbha Rain Update) हजेरी लावली. अमरावती (Amravati Rainfall), वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याला गारपिटीचा तडाखा बसला आहे. तसेच आज देखील यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात सकाळीच पावसाला सुरुवात झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यासह शहरात आज पहाटेपासूनच पावासाला सुरुवात झाली आहे. अमरावतीत शनिवारपासूनच पाऊस अधूनमधून हजेरी लावत असून आज सकाळी देखील पावसाचे जोरदार आगमन झाले. भंडारा आणि नागपूर जिल्ह्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे.

'वेस्टर्न डिस्टर्बन्स'मुळे सध्या विदर्भात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हवामान विभागाने खरं तर रविवारपासून वादळी पावसाचा इशारा दिला होता. मात्र वरुणराजाने एक दिवस अगोदरच मुहूर्त साधला. अमरावती, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यात गारपीट झाली. अमरावती जिल्ह्यातील टाकरखेडा संभू परिसरातील साऊर, कळमगव्हाणा, लसणापूर, रामा, पुसदा, शिराळ्यात गारांसह पाऊस झाला. याचा तूर आणि हरभऱ्याला मोठा फटका बसला आहे.या भागात अर्धा ते पाऊण तास गारांसह पाऊस झाला. नेरपिंगळाई येथे झालेल्या गारपिटीत कांदा, गहू, संत्रा, कापूस या पिकांचे नुकसान झाले. मृगाचा संत्रा गळून पडला.

वर्धा जिल्ह्यातही पिकांचं नुकसान -

जिल्ह्यातील आष्टी आणि कारंजा तालुक्यात वादळी पावसात बोराएवढ्या गारा पडल्या. आष्टी तालुक्यातील खडकी, टोकोडा, भारसवाडा, परसोडा, वाघोली, शिरसोळी, नरसापूर, किन्हाळा आदी भागात जोरदार पाऊस झाला. कारंजा तालुक्यातील पारडी, एकांबा, बोटोणा, सारवाडी, पालोरा, राजणी, बोंदरठाणा या गावात पावसासह गारा पडल्याने पिकांचे नुकसान झाले.

नागपुरातही जोरदार पाऊस -

नागपुरात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. मात्र, सायंकाळी सातच्या सुमारास अचानक आभाळ भरून आले. पाहतापाहता विजांचा प्रचंड कडकडाट व मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरवात झाली. जवळपास अर्धा तास शहरात विशेषतः पश्चिम नागपुरातील गोधनी, झिंगाबाई टाकळी व मानकापूरसह आजूबाजूच्या परिसरात तुफान पाऊस बरसला. या भागांत हलक्या गाराही पडल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hardik Pandya Reaction : लाजीरवाण्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक संतापला; जसप्रीत बुमराहसह बघा कोणाकोणावर खापर फोडलं, वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाला...

RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

SCROLL FOR NEXT