sanjay rathod  
विदर्भ

वनमंत्री राठोडांच्या समर्थनार्थ पुसदमध्ये निघणाऱ्या मोर्चाचा उडाला फज्जा; बंजारा समाजाकडून प्रतिसादच नाही 

दिनकर गुल्हाने

पुसद (जि. यवतमाळ) : भाजप नेत्यांनी राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांना बदनाम करण्याचा हेतूने चालविलेल्या मोहिमेचा निषेध करण्यासाठी  रविवारी (ता. 14) नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय ते उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयावर आयोजित करण्यात आलेला निषेध मोर्चा अखेर निघालाच नाही. या मोर्चासाठी पोलिस विभागाने लावलेला तगडा बंदोबस्त निष्फळ ठरला.

सध्या राज्यभर पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येसंदर्भाने विरोधी पक्षाच्या नेत्यांनी बंजारा समाजाच्या नेतृत्वाची हेतुपुरस्सर बदनामी करण्याची मोहीम उघडली आहे. त्यात बंजारा समाजाचे राजकीय अस्तित्व नष्ट करण्यासाठी विरोधी पक्षाने आखलेला डाव हाणून पाडण्यासाठी पुसद येथील बंजारा कॉलनीतील शिवसेना कार्यकर्ते अर्जुनकुमार सीताराम राठोड यांच्या नेतृत्वात रविवारी शहरातून निषेध मोर्चा काढण्याचे ठरले होते. यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांना कळविण्यात आले. 

सुमारे तीन हजार बंजारा बांधव व शिवसैनिक या मोर्चात सहभागी होतील, अशी माहिती देण्यात आली होती. त्यामुळे रविवारी पोलिस प्रशासनाद्वारे पुसद पोलिस ठाणे व  उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसरात रविवारी सकाळी 11 वाजता तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. यात बंदोबस्त प्रभारी अधिकारी म्हणून अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. के.ए. धरणे, उमरखेड येथील उपविभागीय पोलिस अधिकारी व पुसद प्रभारी वालचंद मुडे यांच्या नेतृत्वात पुसद व उमरखेडचे दोन आरसीपी पथक, तीन पोलिस निरीक्षक,17 साहाय्यक व पोलिस उपनिरीक्षक, 177 पोलिस, 44 महिला पोलिस हजर होते.

 मात्र, मोर्चाची वेळ टळूनही मोर्चा निघालाच नाही. बंजारा बांधवांनी या मोर्चाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अखेर मोर्चाचे आयोजक अर्जुन कुमार राठोड यांनी एका शिष्टमंडळाद्वारे शहर पोलिस ठाण्यात निवेदन सादर केले.

भाजीपाला विक्रेत्यांची दुकाने हटविली

मोर्चाला समाज बांधवांची गर्दी न जमल्याने अर्जुनकुमार राठोड यांच्या नेतृत्वातील निषेध मोर्चाची हवा गुल झाली. मात्र, या मोर्चामुळे बंदोबस्तासाठी तहसील परिसरातील रविवारी आठवडी बाजारासाठी लावण्यात आलेली भाजीपाला व फळविक्री दुकाने हटविण्यात आली. त्यामुळे शेतकरी विक्रेत्यांची धावपळ झाली.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT