krupal tumane and bhavana gawali sakal
विदर्भ

Lok Sabha Election Result : शिंदे सेनेला रामटेक आणि यवतमाळमध्ये उमेदवार बदलणे भोवले

भाजपच्या सांगण्यावरून शिंदे सेनेला रामटेक आणि यवतमाळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलणे चांगलेच भोवले आहे. येथील दोन्ही उमेदवार झाले पराभूत.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - भाजपच्या सांगण्यावरून शिंदे सेनेला रामटेक आणि यवतमाळ लोकसभा मतदारसंघात उमेदवार बदलणे चांगलेच भोवले आहे. येथील दोन्ही उमेदवार पराभूत झाले.

शिंदे सेनेचे खासदार कृपाल तुमाने यांनी सलग दोनवेळा रामटेक जिंकून दिले होते. यवतमाळ मतदारसंघात खासदार भावना गवळी सातत्याने निवडून येत होत्या. मुख्यमंत्री शिंदे बाहेर पडल्यानंतर तुमाने आणि गवळी दोन्ही खासदार त्यांच्यासोबत गेले. महायुतीमध्ये त्यांची उमेदवारी पक्की मानली जात होती.

मात्र, भाजपने निवडणुकीपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात हे दोन्ही उमेदवार पराभूत होणार असल्याचे दाखवण्यात आले. अहवाल दिला होता. त्यामुळे भाजपने शिंदे सेनेवर दबाव टाकून उमेदवार बदलण्यास भाग पडले. त्यामुळे तुमाने आणि गवळी यांचे तिकीट कापण्यात आले. याची मोठी किंमत महायुतीला चुकवावी लागली.

यवतमाळमध्ये खा. गवळी यांना डावलून शिंदे सेनेने नांदेड येथून उमेदवार आयात केला. राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली. त्या मूळच्या यवतमाळच्या आहेत. त्यांचे पती हिंगोलीचे खासदार होते.

त्यामुळे भावना गवळी नाराज होत्या. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेने संजय देशमुख यांना उमेदवारी देऊन आपला मतदारसंघ शाबूत राखला. रामटेकमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सांगण्यावरून तुमाने यांचा पत्ता कट करण्यात आला. भाजपच्या वाटेवर असलेल्या काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांना शिवसेनेत धाडून त्यांना उमेदवार केले; मात्र याचा काही फायदा महायुतीला झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Minister Statement : ''राजकीय गरज म्हणून जाहीर केल्या अनेक योजना; आता पूर्ण करणं कठीण'', भाजप मंत्र्याची कबुली; राजकीय वर्तुळात खळबळ!

Shalinitai Patil: 'शालिनीताई पाटील यांना अखेरचा निरोप'; सातारारोड येथे अंत्यसंस्कार, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनी श्रद्धांजली अर्पण!

Gold Rate Today : आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण, चांदीही स्वस्त; तुमच्या शहरातील ताजा भाव जाणून घ्या

Solapur Municipal Result:'साेलापूर जिल्ह्यात शिसेनेने रोखली भाजपची विजयी घोडदौड'; हॅट्ट्रिक पुसून भालकेंची नवी इनिंग..

एटलीच्या बिग-बजेट 'साय-फाय'मध्ये दीपिका-अल्लू अर्जुन एकत्र, 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा

SCROLL FOR NEXT