rana couple was released at night in amravati 
विदर्भ

अखेर राणा दाम्पत्याची रात्री सुटका, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नव्याने मोर्चेबांधणी

सुरेंद्र चापोरकर

अमरावती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांना सोमवारी रात्री स्थानबद्ध करण्यात आले होते. सोमवारी रात्री पोलिसांनी त्यांची सुटका केली. त्यामुळे त्यांची ट्रेन चुकली असून आता शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर नव्याने मोर्चेबांधणी करण्यात येत असल्याची माहिती आहे. 

शेतकऱ्यांना हेक्‍टरी 50 हजार रुपये तातडीने नुकसानभरपाई मिळावी तसेच लॉकडाउनच्या काळातील 50 टक्के वीजबिल माफ करण्यात यावे, या मागणीसाठी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे आंदोलन सुरू होते. रवी राणा यांनी गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीच्या समोर महामार्गावर चक्काजाम आंदोलन करून सरकारचे या मागण्यांकडे लक्ष वेधले होते. मात्र, शासनस्तरावर कोणताच निर्णय झाला नसल्याने खासदार राणा व आमदार रवी राणा यांनी आक्रमक आंदोलनाचा निर्धार व्यक्त करीत मातोश्री गाठण्याचा निश्‍चय केला. त्या अनुषंगाने रविवारी (ता.15) सायंकाळी ते युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांसह विदर्भ एक्‍स्प्रेसने जाणार होते. परंतु, पोलिसांनी त्यांना नोटीस बजावून पोलिस आयुक्तालयात स्थानबद्ध केले. उशिरा रात्री त्यांची सुटका करण्यात आली. 

ताब्यात करण्याचा अधिकार नाही -
निवेदन देण्यासाठी जाणाऱ्या लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने ताब्यात करण्याचा अधिकार पोलिसांना नाही. मात्र, तरीसुद्धा त्यांनी नोटीस जारी करून ताब्यात घेतले. त्यामुळे या कारवाईच्या विरोधात निश्‍चितपणे आवाज उठविला जाईल, असे आमदार रवी राणा यांनी सांगितले. 

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार -
खासदार नवनीत राणा या राष्ट्रपती, पंतप्रधान, गृहमंत्री, लोकसभेच्या सभापतींकडे तक्रार करणार असून आमदार रवी राणा राज्यपाल तसेच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करणार आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Vidhan Parishad Election: विधान परिषद निवडणुकीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची माघार; 'या' कारणामुळे घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update : गडचिरोली प्रकल्पावरून आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

Smriti Mandhana: 'या' तारखेला रंगणार भारत पाकिस्तान हायव्होल्टेज सामना; त्याआधीच स्मृती मंधानाने चाहत्यांना केली मोठी विनंती, म्हणाली...

'या' गाजलेल्या गाण्याच्या शूटपूर्वी अशोक मामांचा झालेला भीषण अपघात ! वर्षा यांनी सांगितली आठवण

Investment: सेव्हिंग्स खात्यांमधून पैसे काढून भारतीय करतायत 'या' ठिकाणी मोठी गुंतवणूक; कारण काय? RBIच्या अहवालातून मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT