Rana Couple latest news google
विदर्भ

राणा दाम्पत्यावर अमरावतीत दुग्धाभिषेक; गदा हातात घेऊन शक्तिप्रदर्शन

स्पॉन्डिलायसिसच्या उपचारांसाठी नवनीत राणा रुग्णालयात दाखल होत्या

सकाळ डिजिटल टीम

स्पॉन्डिलायसिसच्या उपचारांसाठी नवनीत राणा रुग्णालयात दाखल होत्या

मागील काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा पठण या मुद्द्यांवरून राज्याचं राजकारण तापलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानासमोर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा अमरावतीचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी दिला. याप्रकरणी या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केल्यानं जेलवारी करावी लागली. दरम्यान, बऱ्याच दिवसांनी परतलेल्या राणा दाम्पत्याचे काल अमरावतीत जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी राणा दाम्पत्याचा मंत्रोच्चाराच्या गजरात दुग्धाभिषेक करण्यात आला. (Rana Couple latest news)

मातोश्रीसमोर हनुमान चालीसाचे पठण करण्याचा निश्चय केल्यानंतर राणा दाम्पत्याला 14 दिवस मुंबईमध्ये तुरुंगात रहावं लागलं होतं. यावेळी खासदार राणा या स्पॉन्डिलायसिसच्या उपचारांसाठी नवनीत राणा रुग्णालयात दाखल होत्या. शिवसेनेनं याप्रकरणी मुद्दा उचलून धरल्याने राणा दाम्पत्य आणि शिवसेना हा वाद शिगेला पोचला. या घटनेनंतर तब्बल 36 दिवसांच्या नंतर राणा दाम्पत्य अमरावतीत परतले आहेत. त्यांचे आई-वडील आणि नातेवाईक त्यांची आतुरतेने वाट पाहत होते.

दरम्यान, काल अमरावतीमध्ये राणा दाम्पत्याचे विविध ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्वागतासाठी एक क्विंटलचा हार घातला होता. कार्यकर्त्यांच्या वतीनं राणा दाम्पत्याचा दुग्धाभिशषेक करण्यात आला. मंत्रोच्चाराच्या गजरात राणा दाम्पत्याचा दुग्धाभिषेक करण्यात आला. यासंबंधीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियात चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचं विघ्न असून ते दूर व्हावं म्हणून आम्ही संकटमोचन हनुमानाकडे प्रार्थना करत आहोत, अशी टीका 36 दिवसानंतर विदर्भात परतलेल्या खासदार नवनीत राणा (Navneed Rana) यांनी केली. नवनीन राणा यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, विदर्भातील जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांच्या समस्या, लोडशेडींग, बेरोजगारी या संदर्भात मुख्यमंत्री यांनी किती बैठकी घेतल्या याचा खुलासा करावा असे आवाहनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT