Ransom demanded from a shopkeeper in Amravati
Ransom demanded from a shopkeeper in Amravati 
विदर्भ

‘सेक्‍स रॅकेट’च्या साखळीत अडकला दुकानदार; धमकी देत मागितली दहा लाखांची खंडणी

संतोष ताकपिरे

पथ्रोट (जि. अमरावती) : जिल्ह्यातील केंद्रीय महामार्गालगतच्या ठिकाणी सुरू असलेल्या सेक्‍स रॅकेटच्या साखळीत एक दुकानदार अडकला. त्याला ‘ब्ल्यू फिल्म’ दाखवून ती वायरल करण्याची धमकी देऊन दहा लाखांची खंडणी मागण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. यासाठी एका व्यक्तीने मध्यस्थी केल्याने या सेक्‍स रॅकेटशी त्याचा संबंधसुद्धा जोडण्यात येत आहे.

युवकाने पाच लाख ७० हजार रुपये दिल्यावरही उर्वरित रकमेसाठी या रॅकेटकडून तगादा सुरू असल्याने सदरचे प्रकरण गावपरिसरात ठिकठिकाणी चर्चिला जात आहे. पथ्रोटच्या जवळ असणाऱ्या एका गावातील तरुण हा येथील दुकानावर वारंवार येत असताना त्याची दुकानदाराने विचारपूस केली. त्यावेळी त्याने सेक्‍स वर्करबाबत दुकानदाराला माहिती दिली. त्यावर तिला भेटण्याची इच्छा त्या दुकानदाराकडून व्यक्त होताच त्या तरुणाने सदर दुकानदाराला घेऊन अमरावती गाठले.

केंद्रीय महामार्गालगतच्या एका लहान गावामध्ये असलेल्या एका खोलीवर नेले. त्या बंद खोलीमध्ये तरुणी व या दुकानदारामध्ये जे झाले त्याची एक चित्रफीत तयार करण्यात आली. नंतर ती त्याला दाखवून दहा लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. खंडणी न दिल्यास ती ‘ब्ल्यू फिल्म’ वायरल करून पोलिस ठाण्यात तक्रार देण्याची धमकीसुद्धा त्याला देण्यात आली.

या प्रकाराने प्रचंड घाबरलेल्या दुकानदाराने बदनामीला घाबरून पाच लाख ७० हजार रुपये त्यांच्या हवाली करून सोन्याची साखळी व अंगठीसुद्धा दिली. परंतु, एवढ्यावरही त्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी उर्वरित चार लाख ३० हजार रुपयांची रक्कम मिळविण्यासाठी त्या दुकानदाराकडे एकसारखा तगादा लावला.

एवढ्यावरच न थांबता ते वारंवार त्या तरुणीच्या माध्यमातून पोलिस ठाण्याला तक्रार देण्याची तसेच ती ब्ल्यू फिल्म वायरल करण्याची एकसारखी धमकी त्याला देत आहेत. घडलेल्या प्रकारामुळे सदरचा व्यक्ती प्रचंड दहशतीखाली वावरत असल्याची चर्चा गावात आहे.

पोलिसात तक्रार नाही

या प्रकरणाची सर्वत्र चर्चा असली तरी पोलिसात मात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. हे प्रकरण पानटपरीपासून तर गावातील चावडीवर चवीने चर्चिला जात आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT