rats tried to eat body of kid in postmortam room 
विदर्भ

धक्कादायक! उंदरांनी कुरतडला बालकाचा मृतदेह, या जिल्ह्यात घडली घटना

सकाळ वृत्तसेवा

समुद्रपूर(जि. वर्धा) : तालुक्यातील रेणकापूर येथे पाण्याच्या टाक्यात बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्याचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता येथील ग्रामीण रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला होता. हा मृतदेह सकाळी बाहेर काढला असता तो उंदरांनी कुडतडल्याचे दिसून आले. ही धक्कादायक घटना शनिवारी (ता. १३) सकाळी उघडकीस आली.
 
हा प्रकार चिमुकल्याच्या कुटुंबीयांना कळताच त्यांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला. गावकऱ्यांनी व्यक्त केलेल्या रोषामुळे येथे बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याची माहिती तहसीलदार राजू रणवीर यांना कळताच त्यांनी रुग्णालय गाठत या प्रकरणाची चौकशी करीत दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनावर गावकèयांनी नमते घेतले. यानंतर शवविच्छेदनाच्या प्रक्रियेला प्रारंभ झाला.

रेणकापूर येथे शुक्रवारी (ता. १२) सायंकाळी घराच्या अंगणात अंगणात खेळत असलेल्या अडीच वर्षीय प्रथम ऊर्फ गणेश राजू निखाडे हा बाल पाण्याच्या टाक्यात पडला. परिसरातील नागरिकांनी त्याला काढून ग्रामीण रुग्णालयात नेले. येथे डॉ. फरहीन यांनी त्याला मृत घोषित केले होते. याच कुटुंबीयांनी मृतदेह देण्याची मागणी केली. परंतु, रुग्णालयाकडून शवविच्छेदन केल्या शिवाय मृतदेह देण्यास नकार देण्यात आला. रात्रभर बालकाचे शव शवविच्छेददगृहात ठेवण्यात आले.

सकाळी शवविच्छेदन करण्यासाठी जेव्हा बालकाचे शव काढले तेंव्हा ते उंदराने कुरतडल्याचे दिसून आले. यामृळे मृत बालकाच्या कुटुंबीयांमध्ये रोष निर्माण झाला. यावेळी रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार राजू रणवीर यांच्यासह पोलिसांनी रुग्णालय गाठले. या घटनेत दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी मृतक बालकाच्या कुटुंबीयांनी केली आहे.
 

समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयांतर्गत येत असलेल्या रेणकापूर येथील बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तसेच या बालकाचा मृतदेह शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आला असता उंदरांनी तो कुरतडल्याचीही माहिती मिळाली. या प्रकरणासंदर्भात एक चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त होताच दोषींवर कठोर कारवाई कारवाई करण्यात येईल.
- डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा शल्य चिकित्सक, वर्धा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT