आमगाव : आगीत जळालेले गोठे व घराची पाहणी करताना आमदार सहसराम कोरोटे. 
विदर्भ

आसोली येथे आगीचे रौद्र रूप; चार शेतकऱ्यांचे आठ लाख 40 हजारांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

आमगाव (जि. गोंदिया) : तालुक्‍यातील आसोली येथे झालेल्या अग्नितांडवात एकाच कुटुंबातील मात्र वेगवेगळे राहणाऱ्या चार जणांचे तीन गोठे व एक घर जळून खाक झाले. ही घटना शुक्रवारी (ता. 8) पहाटे अडीचच्या सुमारास घडली. यात चार शेतकऱ्यांचे एकूण 8 लाख 40 हजारांचे नुकसान झाले.

या आगीत धोंडूजी बाबूलाल हरिणखेडे यांचे घर, नगदी 1 लाख 20 हजार रुपये, 2 लाख रुपयांचे सोने, जीवनावश्‍यक साहित्य जळाले. यात त्यांचे 3 लाख 35 हजार रुपयांचे नुकसान झाले. राधेश्‍याम धोंडूजी हरिणखेडे यांचा गोठा, जनावरांचा चारा, शेतीपयोगी अवजारे, बियाणे, कोंबडी जळून 1 लाख 95 हजार रुपयांचे नुकसान झाले. मेघनाथ धोंडूजी हरिणखेडे यांचा गोठा, कवेलू, जनावरांचा चारा, सायकल, बैलबंडी व अन्य साहित्य जळाले. यात 1 लाख 20 हजार रुपयांचे नुकसान झाले. तसेच घनश्‍याम धोंडूजी हरिणखेडे यांचा गोठा, कवेलू, जनावरांचा चारा, शेतीपयोगी अवजारे जळून 1 लाख 90 हजार रुपयांचे नुकसान झाले.

आगीच्या ज्वाळा गावकऱ्यांना दिसल्या

गाढ झोपेत असताना हरिणखेडे यांच्या घराच्या दिशेने आगीच्या ज्वाळा दिसल्याने काही गावकरी जागे झाले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करून आग आटोक्‍यात आणण्याचा प्रयत्न केला. घटनेची माहितीही अग्निशमन दलाला दिली होती. परंतु, अग्निशमन दल उशिरा घटनास्थळी पोहोचले. तोपर्यंत तीन गोठे आणि घराची राखरांगोळी झाली होती.

कशी लागली आग?

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच महसूल विभाग, तलाठी व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. आमगाव पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.


मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीचे आश्वासन

आसोली येथील धोंडूजी हरिणखेडे यांच्या घर व गोठ्याला लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले. दरम्यान, आमदार सहसराम कोरोटे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT