Ravi Rana Team eSakal
विदर्भ

आमदार रवी राणांना शाईफेक प्रकरण भोवणार? हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

शाईफेक प्रकरणाच्या निषेधार्ह मनपा कर्मचाऱ्यांचं आज काम बंद आंदोलन.

सुधीर काकडे

अमरावतीत (Amravati) छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे. पुतळ्याच्या प्रकरणावरून अमरावती महानगर पालिका आयुक्तांच्या (Municipal Commissioner of Amravati) अंगावर शाई फेकण्याचा प्रकार काल घडला आहे. राजापेठ उड्डाणपुलावर बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रशासनाने हटवल्यानं शिवप्रेमी नाराज झाले होते. त्याच प्रकरणातून काल महानगर पालिका आयुक्तांवर शाईफेक करण्यात आली. या प्रकरणात आमदार रवी राणा (Ravi Rana) यांच्यासह १० जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरावती महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर राजापेठ उड्डाणपुलावर शाई फेकण्यात आली. या प्रकरणी रवी राणा यांच्यासह १० जणांवर कलम ३०७ अंतर्गत हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात रवी राणा यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे. अमरावतीमधील राजापेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला होता. हा पुतळा महानगरपालिकेने काही काळाने हटवला. त्यानंतर परिसरात प्रचंड बंदोबस्त तैनात केला होता. हा पुतळा हटवू नये अशी मागणी काही संघटनांनी केली होती. यामध्ये रवी राणा, नवणीतकौर राणा हे आघाडीवर होते.

खासदार नवणीत राणा काय म्हणाल्या?

मनपा आयुक्तांवर झालेल्या शाईफेक प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर आता आमदार रवी राणा आणि खासदार नवणीत राणा यांनी प्रतिक्रीया दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा काढल्यामुळे संतापलेल्या शिवप्रेमींनी शाईफेक केली, ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी आपण दिल्लीला होतो असं रवी राणा म्हणाले आहेत. तसंच मला जाणीवपुर्वक अडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचं म्हणत त्यांनी गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप केले. तर आमदार नवणीत कौर राणा यांनी हा शिवप्रेमींचा राग असल्याचं म्हटलं आहे. तसंच शाईफेक प्रकरणात आपण शिवप्रेमींच्या सोबत आहोत असं नवणीत राणा म्हणाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT