the red and blue watershed map of the erai river was postponed in chandrapur 
विदर्भ

इरई नदीच्या लाल, निळ्या नकाशाला स्थगिती; दोषविरहित पूररेषा निश्‍चितीसाठी होणार अभ्यास

श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : शहरातील इरई नदीच्या लाल व निळ्या पूररेषा दर्शक नकाशाला स्थगित देण्यात आली आहे. मनपाचे आयुक्त, चंद्रपूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांची समिती स्थापन करून नव्याने दोषविरहित नकाशा तयार करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. माजी अर्थमंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बोलाविलेल्या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. 

मंगळवारी (ता. ८) जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर शहरातील इरई नदीच्या लाल व निळ्या पूररेषादर्शक नकाशासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सदर नकाशा हा सदोष असल्याने व त्या माध्यमातून अतांत्रिकदृष्ट्या पूररेषा निश्‍चित करण्यात आल्याने सदर पूररेषेवर पुनर्विचार करण्यात यावा व नव्याने दोषविरहित पूररेषा निश्‍चित करण्यात यावी, अशी मागणी केली. शहरातील मौजा गोंविदपूर रिठ संपूर्ण, मौजा वडगाव, पठाणपुरा परिसराच्या बहुतांश क्षेत्रात विकास परवानगी नाकारण्यात येत आहे.

कार्यकारी अभियंत्यांच्या पत्रान्वये प्राप्त नकाशानुसार चंद्रपूर शहरातील निळी पूररेषा बाधीत क्षेत्र हे ४५० हे. आहे. चंद्रपूर शहर हे तीन बाजूने जंगलाने वेढलेले आहे. शहराच्या विकासासाठी हेच क्षेत्र शिल्लक होते. आता या क्षेत्रातील विकास परवानग्या थांबविण्यात आल्यामुळे या क्षेत्रातील रहिवाशांत रोष निर्माण झालेला आहे. यामुळे मनपाच्या उतपन्नात घट होऊन अनधिकृत बांधकामे सुरू झालेली आहे. पूररेषा निश्‍चित करताना पाटबंधारे विभागाने शहराच्या, पुराच्या पाण्याचा प्रत्यक्षपणे कोणत्या जागेपर्यंत प्रादुर्भाव होतो याचा विचार न करता अत्यंत अतांत्रिकदृष्ट्या पूररेषा निश्‍चित केल्याचे मत बहुतांश नागरिकांनी व्यक्त केले. 

अभ्यास समिती स्थापन - 
महानगरपालिकेने याबाबत सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर केलेला आहे. यासंबंधीचा अहवाल सदोष असून अहवालातील त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने तसेच लाल व निळ्या पुररेषादर्शक नकाशाला स्थगित देत मंनपा आयुक्त, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांची अभ्यास समिती स्थापन करून प्रत्यक्ष नागरिकांशी, लोकप्रतिनिधींशी चर्चा करून दोषविरहित नकाशा तयार करण्याची आवश्‍यकता असल्याची भूमिका आमदार मुनगंटीवार यांनी सदर बैठकीत मांडली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought 2026: महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर! तुमचा तालुका आहे का चेक करा... जिल्हानिहाय संपूर्ण यादी समोर

वानर थेट वाइन शॉपमध्ये घुसला; दारू प्यायली अन् पुढे जे घडलं ते पाहून लोकंही थक्क

Latest Marathi News Live Update : लालबागच्या राजाचं 24 तासांनंतर विसर्जन, भाविकांचे पाणावले डोळे; समुद्रकिनारी मोठी गर्दी

तेव्हा मी अरिजीतपेक्षा जास्त लोकप्रिय होतो... अभिजीत सावंतचं मोठं विधान; म्हणतो- त्याला कुणी ओळखत नव्हतं

Maharashtra Drought 2026 : राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, ट्रिगर-१ लागू झालेल्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना तातडीने मदत

SCROLL FOR NEXT