farm commodity.jpg 
विदर्भ

शेतमाल खरेदीसाठी बाजार समितीत नोंदणी सुरू, मात्र या सूचना पाळणे अनिवार्य

सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर (जि.अकोला) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने धान्य खरेदी सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी (ता.16) पासून नोंदणी सुरू करण्याचे आवाहन बाजार समिती प्रशासनाकडून करण्यात आले आहे. लाकडाउन झाल्याने अनेक शेतकऱ्यांचा माल घरात पडून होता. मात्र, आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. 

कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमी असल्याने काळजी घ्यावी लागणार आहे. मास्क, रुमाल बांधावे, सामाजिक अंतर राखावे असेही बाजार समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. गहू, तूर, हरभरा आदी रब्बी पिकांची आवक शेतकऱ्यांच्या घरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. खरेदी मात्र लॉकडाउनमुळे बंद आहे. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. येथील बाजार समितीने 9 एप्रिल पासून शेतकऱ्यांच्या गव्हाचा शासनाच्या सूचनेप्रमाणे सोशल डिस्टंसिंग राखून लिलाव केलेला आहे. 

त्याच धर्तीवर हरभरा, तूर, सोयाबिनचा लिलाव करण्याची गरज लक्षात घेऊन उद्यापासून नोंदणीस सुरुवात करून खरेदी करण्याचा निर्णय बाजार समितीने घेतला आहे. सर्व अडत्यांनी आपआपल्या शेतकऱ्यांना बाजार समितीत नोंदणी करण्याबाबत सूचित करावे. सकाळी 7 ते 10.30 यावेळेत तोंडावर रुमाल किंवा मास्क बांधून येणे बंधनकारक असेल. केवळ दोन व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येईल. नोंदणी केलेलाच शेतमाल घेण्यात येईल. शेतमाल आणण्यासबंधी शेतकऱ्यांना फोन करून सुचित करण्यात येणार आहे. बाजार समितीमध्ये येणारे शेतकरी, खरेदीदार, अडते व इतर घटकांनी 4 फुटाचे अंतर ठेवुनच कामकाज करावे. 

शेतमाल नोंदणी 8550952578, 9850123256, 9822444143 क्रमांकावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत करावी, असे आवाहन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड.भैय्यासाहेब तिडके व सचिव रितेश मडगे यांनी केले आहे. वरील निर्णयामुळे शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. मात्र वैयक्तिक व कौटुंबिक सुरक्षा लक्षात घेता शासनाच्या सर्व नियमांचे पालन प्रत्येक शेतकऱ्यांना करावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे? ''राज्यातील बड्या नेत्यांचं मला संपवायचं कारस्थान...''

IPL 2026 Marathi News: वैभव सूर्यवंशीला आयपीएल सुरू होण्यापूर्वी कॅप्टन रियान परागचा सल्ला; म्हणाला, त्यांच्यापासून दूर राहा...

Dombivli: डोंबिवलीत २८वी स्वागतयात्रा; संस्कृती आणि राष्ट्रभावनेचा भव्य संगम, यंदा काय खास ठरलं? जाणून घ्या...

Viral Video : ही तर साक्षात देवीच! निरागस डोळे अन् मोहक हास्य; अवघ्या 3 महिन्यांच्या चिमुकलीचं हे रूप पाहून तुम्हीही भारावून जाल, व्हायरल व्हिडिओने जिंकली लाखो हृदय

Junnar News : जुन्नरमध्ये डॉक्टरकडे खंडणीची मागणी; बेकायदेशीर बांधकामाचा धाक दाखवत ३५ लाखांची मागणी

SCROLL FOR NEXT