विदर्भ

यवतमाळमधील खासगी कोविड हॉस्पिटलची तोडफोड; हलगर्जीपणाचा आरोप करीत नातेवाईक संतप्त

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : शहरातील कोविड डेडिकेटेड डॉ. महेश शाह यांच्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित महिला रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाइकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केल्याने वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (ता.28) रात्री साडेआठच्या दरम्यान घडली.

कविता धनराज चव्हाण असे मृत रुग्णाचे नाव आहे. ही महिला कोरोनाबाधित असल्याने उपचारासाठी डॉ. शहा यांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये तिला दाखल करण्यात आले होते. ती घाटंजी तालुक्‍यातील शिवणी येथील रहिवासी होती. रुग्णालयात प्रकृती चिंताजनक होती. यातच उपचारादरम्यान रुग्णालयातील नर्स स्टाफने रुग्णाचे ऑक्‍सिजन मास्क काढल्याने मृत्यू झाला, असा आरोप करीत संतप्त नातेवाइकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. तर कविताची ऑक्‍सिजन लेवल कमी झाल्याने सी पॅप काढून व्हेंटिलेटर लावत असताना मृत्यू झाल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.

संतप्त नातेवाइकांनी टीव्ही, संगणक, दरवाजाच्या काचा फोडून आदी अन्य साहित्याचे नुकसान केले आहे. त्यामुळे काही काळ रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेची माहिती मिळताच अवधूतवाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठले. रात्री रुग्ण नातेवाइक आणि डॉक्‍टरांनी पोलिसांत तक्रार देण्याची तयारी चालविली होती. मात्र, वृत्तलिहेस्तोवर पोलिसांत तक्रार करण्यात आली नव्हती.

घाटंजी तालुक्‍यातील शिवणी येथील रुग्णाला डॉ. शहा यांच्या कोविड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे हलगर्जीपणा करण्यात आल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी रुग्णालयात तोडफोड केली. या प्रकरणाची पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली नाही.
- डॉ. मनोज केदारे, पोलिस निरीक्षक, अवधूतवाडी पोलिस ठाणे, यवतमाळ.

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

Ratnagiri MIDC D Plus Category : रत्नागिरीसाठी ऐतिहासिक निर्णय! एमआयडीसीचा दर्जा थेट 'ड प्लस'; उद्योजकांना मिळणार गडचिरोलीसारख्या बंपर सवलती

Smartwatch Technology: हाताची हालचाल की चालणे? स्मार्टवॉचला कसे कळते तुम्ही किती चाललात? पाहा इनबिल्ट सेन्सर्सचे तंत्रज्ञान...

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Katraj-Kondhwa Road Land Acquisition Dispute: कात्रज-कोंढवा रस्त्यावर भूसंपादनाचा पेच कायम; काही मालमत्ता अवॉर्डमध्ये राहिल्याने गोंधळाची स्थिती; पथविभागाला सलग रस्ता करण्यास अडचणी

SCROLL FOR NEXT