विदर्भ

धक्कादायक! नातेवाईकांनाच उचलायला लावलं कोरोनाग्रस्ताचं प्रेत; समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

सकाळ डिजिटल टीम

समुद्रपूर (जि. वर्धा) : समुद्रपूर तालुक्‍यातील बरबडी गावातील एका व्यक्तीचा शुक्रवारी (ता. 16) दुपारी 2 वाजता कोरोनामुळे समुद्रपूर ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला. यावेळी मृतदेह रुग्णालयातून हिंगणघाट येथे अंतसंस्कारासाठी नेण्यासाठी नातेवाइकांना उचलण्यास सांगितल्याचा धक्‍कादायक प्रकार येथे घडला.

हा प्रकार पाहून प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख जयंत तिजारे यांनी येथील महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची चांगलीच खरड काढली. यावर डॉक्‍टरांनी हे नातेवाइकांचेच काम असते असे उत्तर दिल्याने वातावरण अधिकच तापले.

अखेर नातेवाइकांनी मृतदेह उचलून स्वत:च्या हाताने स्वर्गरथात ठेवला. येथून हा मृतदेह हिंगणघाट येथील मोक्ष धामावर अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला. या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली.

आज बरबडी गावातील एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यावेळी मृतदेह हिंगणघाट येथे पाठविण्यासाठी उचलून शववाहिनीत ठेवण्यासाठी नगरपंचायतीला दोन कर्मचाऱ्यांची मागणी केली. मात्र त्यांच्याकडे कर्मचारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे मृतकाच्या नातेवाइकांना पिपिईकिट लावून मृतदेह शववाहिनेत ठेवण्यास मदत करण्याची विनंती केली.
- डॉ. कल्पना म्हैस्के, वैद्यकीय अधिकारी समुद्रपूर

संपादन - अथर्व महांकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! हिंजवडी-शिवाजीनगर ‘रेड लाइन’ सज्ज; एप्रिलपासून मेट्रो धावणार, २३ किमी मार्गाच्या चाचण्या यशस्वी..

MHADA Mumbai Lottery : मुंबईत स्वस्तात घर घेण्याची सुवर्णसंधी ! म्हाडाच्या FCFS सदनिकांसाठी आजपासून अर्ज नोंदणी सुरु, काय आहे प्रक्रिया ?

Mumbai Crime : शिवाजीनगर हत्या प्रकरणात मोठी कारवाई; मुख्य आरोपी नदीमचा साथीदार 'रिझवान DJ'ला अटक, 40 लाखांचे अमली पदार्थ जप्त

Pune News: महसूल विभागाचा निर्णय! राज्यातील ११ अपर जिल्हाधिकारी, ६९ अपर तहसील कार्यालयांची नव्याने होणार निर्मिती..

मालवणच्या समुद्रकिनारी एकाचवेळी ७५ डॉल्फिनचा कळप, ड्रोनने टिपले दुर्मिळ आणि विहंगम दृश्य; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT