Remarriage of parents due to children in Yavatmal district 
विदर्भ

मुलांमुळे आई-वडिलांना अनुभवता आला विवाह सोहळा; आयुष्याच्या सायंकाळी दाम्पत्य चढले बोहल्यावर

बबलू जाधव

आर्णी (जि. यवतमाळ) : विवाह सोहळा हा आयुष्यातील आनंदाचा क्षण. मात्र, पूर्वी बालवयातच विवाह होत असल्याने या आनंदाच्या क्षणापासून अनेकांना वंचित रहावे लागत होते. आपल्या विवाहाच्या आठवणीही त्यांच्या स्मरणात नाही. तालुक्‍यातील लोणी येथील हिवराळे दाम्पत्याला मुलांनी आयुष्याच्या सायंकाळी बोहल्यावर चढविले. सोमवारी (ता. १६) त्यांना पुन्हा आपल्या विवाहाचा सोहळा अनुभवता आला.

लोणी येथील सीताराम उंद्राजी हिवराळे यांचा खंडाळा येथील निर्मला सूर्यभान इंगोले यांच्यासोबत १६ नोव्हेंबर १९५५ साली विवाह झाला होता. त्यावेळी सीताराम यांचे वय १२ वर्षे तर निर्मला यांचे वय अवघे सात वर्षे होते. बालपणी झालेल्या विवाहाची आठवण या दाम्पत्याला नाही. त्यामुळे मुलांनीच आई-वडिलांचा विवाह सोहळा आयोजित केला.

हिवराळे दाम्पत्याला तीन मुले आहेत. मोठी मुलगी तुळजा जोगदंड (रा. सायखेडा ता. दारव्हा), दुसरा मुलगा पुंडलिक तर, तिसरा मुलगा पंडित आहे. हिवराळे कुटुंबीयांनी आपल्या आई-वडिलांचे लग्न बालवयात झाल्याने त्यांना विवाह झाल्याचे आठवत नाही.

त्यामुळे सीताराम हिवराळे (वय ८५) व निर्मला हिवराळे (वय ७२) यांचा विवाह ६५ वर्षांनंतर पुन्हा एकदा झाला. नवरदेवाचे पालक मोठा मुलगा पुंडलिक हिवराळे तर, लहान मुलगा पंडित नवरीचा पालक झाला. यावेळी नातेवाइकांसह कुटुंबातील सर्वच सदस्य उपस्थित होते.

दोघांनाही लागली हळद

रितीरिवाजानुसार दोघांनी रविवारी (ता. १५) हळद लावण्यात आली. सोमवारी फटाक्‍यांची आतषबाजी करीत कार हनुमान मंदिराच्या पारावर नेण्यात आली. लग्नमंडपी नवरी व नवदेवाचा शुभमंगल सावधानने पुनर्विवाह सोहळा रंगला. वरातीसाठी जेवणाचे आयोजनही करण्यात आले होते. लग्नघरी जी धामधूम आणि उत्साह असतो, तो येथेही बघावयास मिळाला.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Update: वादळी पावसाचा इशारा कायम; राज्यात यलो अलर्टचा इशारा, हवामान विभागानं नेमकं काय सांगितलं?

Women's World Cup 2025: आता रंगणार सेमीफायनलचा थरार! कोण कोणाला भिडणार? कुठे अन् कधी पाहाणार सामने, वाचा एका क्लिकवर

छोट्या करदात्यांना व्याजमाफीचा दिलासा

DMart Sale : डीमार्टमध्ये 'या' तारखेपासून सगळ्यात स्वस्त वस्तूंचा सेल सुरू होणार; खरेदीला जाण्यापूर्वी सिक्रेट ऑफर्स, पहा एका क्लिकवर

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 27 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT