reservation announce for hingana corporation election in nagpur 
विदर्भ

हिंगणा नगरपंचायत निवडणुकीसाठी पक्षांची मोर्चेबांधणी, १० डिसेंबरला आरक्षण हरकतीवर सुनावणी

अजय धर्मपुरीवार

हिंगणा (जि. नागपूर ) :  नगरपंचायत निवडणुकीसाठी वार्डनिहाय आरक्षण जाहीर झाले. यानंतर आरक्षणानुसार उमेदवारांची शोध मोहीम जोमाने सुरू आहे. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार निवडण्यात आघाडीवर आहे. १० डिसेंबरला आरक्षण हरकतीवर सुनावणी होणार आहे. निवडणुकीनिमित्त राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. 

हिंगणा नगरपंचायतची दुसरी पंचवार्षिक निवडणूक आहे. १७ वॉर्ड असलेल्या नगर पंचायतीत कसबा व धनगरपुरा हे दोन विभाग महत्वाचे आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व काँग्रेस पक्षाने निवडणुकीची चाचपणी सुरू केली. आरक्षणानुसार उमेदवार निवडण्यामध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस सद्यपरिस्थितीत आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. भाजप आमदार समीर मेघे यांनी नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात हिंगणा येथे वीजबिल आंदोलनानंतर पक्षातील वरिष्ठ नेते व नगरसेवकांशी चर्चा केली. विश्वासू समजल्या जाणाऱ्या तीन कार्यकर्त्यांसोबत त्यांनी बंदद्वार स्वतंत्र चर्चा केली. या चर्चेत पक्ष महत्त्वाचा आहे. गटातटाचे राजकारण बाजूला सारून पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना कशी संधी देता येईल, अशी भूमिका सर्वांनी ठेवावी. उमेदवार निवडताना अंतिम निर्णय स्वतः घेणार असल्याची सूचना आमदार महोदयांनी कार्यकर्त्यांना दिली. यामुळे वळवळ करणारे कार्यकर्ते थंड झाले असल्याचे दिसून येत आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग व जि.प. सदस्य दिनेश बंग यांनी पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. जनतेच्या भावना ओळखून पक्षातील कार्यकर्त्यांना संधी देण्याची रणनीती आखण्यात आली आहे. नगरपंचायतची सत्ता काबीज करण्यासाठी पक्षातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळ घालून निवडणूक लढविण्याचे संकेत त्यांनी दिले. यामुळे उमेदवार निवडताना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विशेष काळजी घेण्यात येणार आहे. १० डिसेंबरनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची या संदर्भात बैठक होणार असल्याचे समजते. 

काँग्रेस व शिवसेनाही उमेदवारांच्या शोध मोहिमेत आहेत. काँग्रेसचे माजी सत्तापक्ष नेते बाबा आष्टणकर व शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णू कोल्हे यांचा कार्यकर्त्यांशी संवाद सुरू आहे. मात्र, अद्यापही उमेदवारांची नावे निश्चित झाली नसल्याचे समजते. उमेदवार निवडण्यांमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर असल्याचे चित्र आहे. भाजपचे स्वीकृत नगरसेवक शिरीष देशमुख यांनी पक्षाने तिकीट वाटपाच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी न केल्याचा आरोप केला आहे. यामुळे त्यांनी वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. सद्यस्थितीत अपक्ष पॅनल टाकायचे का, असा विचार त्यांच्या मनात सुरू आहे. याबाबत अंतिम निर्णय वेळेवर घेऊ, असे सूतोवाच त्यांनी केले आहे. यामुळे ऐनवेळी ते कोणत्या पक्षाच्या बाजूने निर्णय घेतात, हे येणारा काळच सांगेल. 

नगरपंचायत निवडणुकीच्या आरक्षणावर १० डिसेंबर रोजी हरकती व सूचनांची सुनावणी होणार आहे. नगर पंचायत निवडणुकीनिमित्त राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी शहरात जोमाने सुरू झाली आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी कार्यकर्त्यांच्या चकरा वरिष्ठ नेत्यांच्या वाड्यावर सुरू झाल्या आहेत. परिणामी राजकीय वातावरण आता हळूहळू तापण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीमध्येही महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला. यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीबाबत उत्साह निर्माण झाला आहे. भाजपला निवडणुकीत रंगतदार लढत देण्यासाठी अभूतपूर्व मोर्चे बांधणी करण्यात येणार असल्याची राजकीय वर्तुळात शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPFO: आता नोकरी बदलली तरी पीएफची चिंता नाही! PF आपोआप ट्रान्सफर होणार; पण कसा? वाचा ईपीएफओचा मोठा निर्णय

IND vs SA, 3rd T20I: अभिषेक शर्मा बरसला, शुभमन गिलनेही दिली साथ; टीम इंडियाची दणदणीत विजयासह मालिकेत आघाडी

गोतस्करी करणारी वाहने स्क्रॅप करावीत! आमदार कोठे यांची अधिवेशनात मागणी; सोलापुरात पुढच्या शैक्षणिक वर्षात सुरु होणार शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय

IND vs SA, T20I: जसप्रीत बुमराह अचानक घरी गेला, पुढच्या दोन टी२० सामन्यात खेळणार की नाही? BCCI ने दिले अपडेट

३० हजार फूट उंचीवर मृत्यूशी झुंज! इंडिगो विमानात घडलेला तो थरारक क्षण! कोल्हापूरकर डॉक्टर बनल्या 'देवदूत'

SCROLL FOR NEXT