rice crop damaged due to diseases in sawali of chandrapur
rice crop damaged due to diseases in sawali of chandrapur 
विदर्भ

रोगराईमुळे धानपीकाचे एकरी फक्त ७ ते १० पोतेच उत्पन्न, भावही मातीमोल

श्रीकांत पेशट्टीवार

सावली (जि. चंद्रपूर ) :  धान चांगल्या स्थितीत असताना रोगाने हल्ला चढविला. काही प्रमाणावर रोग आटोक्‍यात येत असतानाच धानावर तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला. धान कापेपर्यंत संपूर्ण पीकाचे नुकसान झाले. महागडी कीटकनाशक फवारणी केल्यानंतर किडीचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आला नाही. याचा परिणाम धानाच्या उतारीत मोठी घट झाली. एकरी सात ते दहाच पोते हाती येत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर धानाचे पीक घेतले जाते. यंदा चांगला पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला. त्यानुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांनी धानाची पेरणी केली. तालुक्‍यात 24 हजार 638 हेक्‍टर क्षेत्रावर धानाची लागवड केली. समाधानकारक पावसाने धान चांगल्या अवस्थेत होते. मधल्या काळात अवकाळी पाऊस झाला. त्यानंतर वातावरण ढगाळ होते.

हेच वातावरण किडीस पोषक ठरले. धानावर मावा, करपा, तुडतुड्याने हल्ला चढविला. त्यानंतर कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेतकऱ्यांनी महागड्या फवारणी केली. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला. धान कापणीपर्यंत त्याचे नुकसान झाले. शेवटी धानाचे चुरणे केल्यानंतर त्याची उतारी एकरी 5-6 पोते आले. त्यामुळे बळीराजा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. धानाला 700 रुपये बोनस देण्याची घोषणा केली. मात्र, ती रक्कम अद्याप खात्यात जमा झाली नाही. हमीभावही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : २६ पक्षांची खिचडी असलेल्यांकडून मीच इंजिन - देवेंद्र फडणवीस यांचा इंडिया आघाडीला टोला

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली, MI आत्मसन्मानासाठी तर KKR प्ले ऑफसाठी खेळणार

Lok Sabha Poll 2024 : काम करा अन्यथा उमेदवारी विसरा; फडणवीसांची आमदार, माजी नगरसेवकांना तंबी

ब्रिजस्टोन इंडिया’च्या सीएसआर उपक्रमाची 16व्या ग्लोबल सीएसआर अँड ईएसजी समिट अँड अवॉर्डस् 2024 मध्ये बाजी

SCROLL FOR NEXT