नूतन संजय हरडे नूतन संजय हरडे
विदर्भ

सहा दिवसांची झुंज संपली; जखमी मुलीचा नागपुरात मृत्यू

डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचारासाठी अमरावती व त्यानंतर नागपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते

प्रशिक मकेश्वर.

तिवसा (जि. अमरावती) : अपघातात डोक्याला गंभीर मार लागल्याने सहा दिवस बेशुद्ध असलेली १९ वर्षीय नूतन संजय हरडे (रा. मोझरी) या मुलीने मृत्यूशी झुंज दिली. मात्र, काल सायंकाळी तिची झुंज अपयशी ठरली. उपचारादरम्यान तिचा नागपूर येथील रुग्णालयात मृत्यू (Girl Died) झाला.

नूतन ही शहरातील स्व. लालासाहेब देशमुख महाविद्यालयात बीएच्या द्वितीय वर्षात शिकत होती. २८ डिसेंबर रोजी नियमितपणे महाविद्यालयात जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग ओलांडत असताना तिला कारने धडक (Road Accident) दिली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने उपचारासाठी अमरावती व त्यानंतर नागपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. सहा दिवस उपचाराला प्रतिसाद देत असल्याने डॉक्टरांनी युद्ध पातळीवर उपचार केले. मात्र, काल तिने प्राण (Girl Died) त्यागले. तिच्या मृत्यूने कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. या घटनेने मोझरी गावात शोककळा पसरली आहे.

२८ डिसेंबर रोजी अपघात झाल्यानंतर कार चालकाने (Road Accident) जखमी नूतनला उपचारासाठी रुग्णालयात नेले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून कार चालकाची सर्व कागदोपत्री माहिती घेऊन कारसह चालकाला सोडल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातातील जखमी मुलीचे बयान न झाल्याने नातेवाइकांच्या तक्रारीवरून वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील योग्य ती कारवाई करण्यात येईल.
- संदीप चव्हाण, प्रभारी ठाणेदार, तिवसा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT