chedkhani 
विदर्भ

युवतीची काढली छेड अन्‌ रोड रोमियोला पडला चोप 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : बहिणीची छेड काढणाऱ्या तरुणास युवतीच्या भावाने चांगलेच चोपले. फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील किरणनगर परिसरात ही घटना घडली. न्यायालयाने संबंधितयुवकाची सोमवारी (ता. 25) न्यायालयीन कोठडीअंतर्गत कारागृहात रवानगी केली. 

स्वप्नील मुरलीधर काळमेघ (रा. किरणनगर) असे या युवकाचे नाव आहे. पीडित युवतीची (वय 16) आई मोलमजुरीचे काम करते. पीडिताही आईला मदत करते. रविवारी (ता. 24) पीडिता आई काम करीत असलेल्या ठिकाणी किरणनगर येथून पायदळ जात होती. या वेळी एका झाडाखाली 4 ते 5 टवाळखोर युवक उभे होते. त्यातील स्वप्निल काळमेघने अचानक पीडितेला अडवून तिच्यासोबत असभ्य वर्तन करून छेडखानी केली. शिवाय तिला जिवे मारण्याची धमकी दिली. 

पीडितेने स्वप्नीलच्या तावडीतून सुटका करीत आई व भावाला मोबाईलवरून घटना सांगितली. पीडितेची आई व भाऊ तेथे पोहोचले. पीडितेच्या भावाने आरोपी स्वप्नीलला चांगलाच चोप दिला. त्यानंतर पीडितेने फ्रेजरपुरा ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. या तक्रारीवरून पोलिसांनी स्वप्नीलला अटक करून गुन्हा दाखल केला. सोमवारी (ता. 25) त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले.  

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT