crime 
विदर्भ

तो गेला होता कोरोनाबाधिताच्या घरात चोरी करायला! ऐनवेळी आले पोलिस...

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या कुटुंबांची घरे सध्या कुलुपबंद आहेत. चोरांसाठी ही पर्वणीच आहे. कारण लॉकडाऊनमुळे अनेकजण चोवीस तास घरातच असल्याने चोरांची घरफोडी करण्याची संधी कमी झाली आहे. त्यामुळे एका चोराने नेमके कोरोनाबाधिताचे घरच चोरीसाठी निवडले आणि तो रंगेहात पकडला गेला.
कुटुंबातील एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे इतर सदस्यांना संस्थात्मक विलगीकरणात पाठविण्यात आले. त्याच बंद घरात चोरी करताना एका व्यक्तीला पकडण्यात आले.
सूरज दर्शनाल (वय 29 रा. चपराशीपुरा) असे पकडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. नाजीम शहा वल्द करीम शहा (वय 30 रा. वृंदावन कॉलनी) यांनी फ्रेजरपुरा ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दर्शनाल यास पकडले. सदर घर काही दिवसांपासून बंद असल्याची चाचपणी त्याने आधीच करून घेतली. रविवारी (ता.14 ) मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास सूरज हा त्या बंद घरात घुसला. त्याचे कपाटांसह इतर पेट्याही हुसकल्या. घरमालकास शेजा-यांनी घरात चोर घुसल्याची माहिती दिली. चोरट्याने दाराचे कुलूप तोडून आतून दार बंद करून घेतले होते. नागरिकांनी पोलिसांना कळविताच ताफा घटनास्थळी पोचला. पोलिसांनी घरात घुसलेल्या सूरज दर्शनास यास बाहेर निघण्यास सांगितल्यावर दुपट्ट्याने चेहरा झाकून तो बाहेर येताच त्याला अटक केली. यापूर्वी शहरातील एका कोरोनाबाधित व्यक्तीचे घर फोडून चोरट्यांनी ऐवज लंपास केला होता.

सविस्तर वाचा - कोरोना ब्रेकिंग : या शहराने पार केला हजाराचा पल्ला, गुणाकार पद्धतीने होतेय वाढ

लग्नासाठी ठेवलेले पैसे बचावले
संबंधित व्यक्तीच्या लहान भावाचे लग्न असल्यामुळे आवश्‍यक असलेले पैसे एका लोखंडी पेटीत ठेवले होते. ते पैसे पोलिस आल्यामुळे बचावले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agrawal Murder Case : केतनला धक्का कोणी दिला? पक्का पुरावाच नाही; पोलिसांनी कोर्टाकडे मागितली सियाच्या 'लाय डिटेक्टर' चाचणीची परवानगी

मुंबईसे वांद्रे कैसे जाते है? थेट पाकिस्तानमधून फोन आल्यानं खळबळ, पोलिसांकडून चौकशी सुरू

Shardul Thakur: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली माझ्यासोबत अन्याय झाला! शार्दुल ठाकूरचा थेट आरोप; टीम इंडियाबाबत केला मोठा खुलासा

'तुझे केस विचित्र आहेत' ऑडिशनवेळी मंदार जाधवला दिलेलं रिजेक्शनचं विचित्र कारण, म्हणाला...

Amol Kolhe leaving Sharad Pawar : खासदार अमोल कोल्हे शरद पवारांची साथ सोडणार?; 'महायुतीकडून ऑफर आल्यास विचार करू'

SCROLL FOR NEXT