daru chori 
विदर्भ

चोरांनी फोडले मद्याचे दुकान, अमरावती जिल्ह्यातील सातवी घटना

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : लॉकडाउनच्या काळात इतर व्यवहारांबरोबरच मद्यविक्रीही बंद होती. परिणामी दारूप्रेमी अस्वस्थ होते. त्यामुळे त्याकाळात दारूची दुकाने फोडण्याच्या अनेक घटना घडत होत्या. आता शासनाने दारू विक्रीला परवानगी दिली आहे. त्यामुळे दारू प्रेमींना दिलासा मिळाला आहे. परंतु तरीही काही चोरट्यांनी दारू दुकान फोडल्याच्या दोन घटना नुकत्याच घडल्या.
भातकुलीत बार ऍण्ड रेस्टॉरंट तर अचलपुरातील देशीदारूचे दुकान चोरट्यांनी फोडले. दोन्ही ठिकाणांहून 2 लाख, 62 हजार 965 रुपयांचे मद्य चोरीस गेले. त्यापैकी भातकुली येथील बार जिल्हा प्रशासनाच्या आदेशामुळे बंद होता.
आयुक्तालयाच्या हद्दीत भातकुली ते सायत मार्गावरील शिवाई बार ऍण्ड रेस्टॉरंट जिल्हा प्रशासनाच्या आदेशाने 21 मार्च 2020 पासून सील लागल्याने बंद होते. बुधवारी (ता. तीन) बारमालक रामेश्‍वर नागमोते यांनी बार परिसरात जाऊन पाहणी केली असता, बारचे एक दार तुटून सामग्री अस्ताव्यस्त दिसली. चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. येथील व्यवस्थापक नंदकिशोर कांबे यांच्या तक्रारीवरून भातकुली पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनास्थळी श्‍वानपथक, ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. जिल्ह्यात लॉकडाउन काळात बंद असलेले विदेशी मद्यविक्रीची प्रतिष्ठाने फोडल्याची जिल्ह्यातील ही सातवी घटना आहे.

अचलपूर तालुक्‍यात भूगाव येथील संजय पांडुरंग हूड (वय 50) यांचे देशी दारू विक्रीचे दुकानही चोरट्यांनी फोडले. जवळपास 70 पेट्या बिअर, 2 हजारांची रोख रक्कम, असे एकूण 1 लाख, 61 हजार 455 रुपयांची दारू चोरली. चोरी करून पळताना पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. माल चोरल्यानंतर या दुकानात असलेले बहुतांश सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची चोरट्यांनी पळून जाण्यापूर्वी तोडफोड केली. इतर सामग्रीचेही नुकसान केले. श्री. हूड यांच्या तक्रारीवरून सरमसपुरा ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुणे हादरले ! उच्चभ्रू सोसायटीत अल्पवयीन गतिमंद मुलीवर तीन नातेवाईकांकडून लैंगिक अत्याचार

Gudi Padwa 2026: गुढीसाठी साडी निवडताना करू नका 'या' चुका! जाणून घ्या कोणते रंग ठरतात शुभ-अशुभ

Latest Marathi News Live Update : मुंबईतील चारकोपमध्ये एलपीजी सिलिंडरसाठी रांगा

Ancient Temple Mystery : खोदकाम सुरू असताना अचानक बाहेर आले प्राचीन मूर्तींचे अवशेष; ऋषिकेशच्या 'या' मंदिराचा विस्मयकारक इतिहास समोर, मूर्ती नेमकी कोणाची?

आधी हिंदू मुलीशी लग्न, धर्मांतर करुन युट्यूबर म्हणतो, 'पुरुषांची नजर मला माहिती, बुरखा घालणं गरजेचं'

SCROLL FOR NEXT