विदर्भ

चंद्रपुरातील विहीरगाव बिटात आढळा वाघाचा कुजलेला मृतदेह

श्रीकृष्ण गोरे

राजुरा (जि. चंद्रपूर) : मध्य चांदा वन विभागाच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या विहीरगाव उपक्षेत्र तथा नियतक्षेत्र कक्ष क्रमांक १७२ मध्ये नर वाघ मृतावस्थेत आढळून (found dead tiger) आल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली आहे. वाघाचा मृत्यू कशाने झाला हे शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. सध्या मोका पंचनामा व पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती मध्य चांदा वन विभागाचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे यांनी दिली. (Rotten-carcass-of-a-tiger-found-in-Vihirgaon-bit-in-Chandrapur)

माहिती मिळताच उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, सहायक वनसंरक्षक प्रीतम कुमार कोडापे, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून कार्यवाही केली. विशेष म्हणजे पाच दिवसांपासून वाघाचा मृत्यू होऊन सडण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. असे असताना संबंधित वन कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती कशी मिळाली नाही? या क्षेत्रात काही दिवसांपूर्वी अस्वलीच पिल्लू मृतावस्थेत आढळून आले होते.

सुमठाणा मार्गावर चितळाचा मृत्यू सुद्धा होत आहे. त्यामुळे वन्य जिवाच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष करणाऱ्या वनकर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नेफडो संस्थेचे बादल बेले यांनी केली आहे. गोपनीय पद्धतीने राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात पंचनामा करून वाघावर अंत्यसंस्कार केले.

४ ते ५ दिवसांपूर्वी मृत्यू

वाघाचा मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. वाघाचा ४ ते ५ दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा कयास लावण्यात येत आहे. परंतु, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया वन परिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट यांनी दिली.

(Rotten-carcass-of-a-tiger-found-in-Vihirgaon-bit-in-Chandrapur)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought News : राज्यातील आणखी १८ तालुक्यात दुष्काळ?, पिकांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश; सांगली जिल्ह्यातील दोन तालुक्यांचा समावेश

IND vs WI 2nd T20I: अभिषेक शर्माला जगात भारी बनण्याची संधी; सूर्यकुमारचा वर्ल्ड रेकॉर्ड निशाण्यावर, बाबरचाही विक्रम करणार उद्ध्वस्त

फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये १० हजारांहून अधिक धावा; भारतात जन्मलेल्या या क्रिकेटपटूने ठोकला क्रिकेटला रामराम! पार्थिवसोबतही केलंय ओपनिंग!

Maharashtra Live News : मावळत्या संचालकांत तिघांचा पत्ता कट; बाळासाहेब खाडे, प्रकाश पाटील, ढेंगेंचा समावेश

थकलेला चेहरा, डोक्यावर टक्कल, छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेच्या हिरोची ही अवस्था, तुम्ही ओळखलंत का?

SCROLL FOR NEXT