Dr. Rajendra Gavai sakal
विदर्भ

Dr. Rajendra Gavai : डॉ. राजेंद्र गवई यांचे ‘एकला चलो रे’; महाविकास आघाडीला दिला १५ दिवसांचा अल्टीमेटम

धर्मांध शक्तींना रोकण्याचा ठेका केवळ आपणच घेतलेला नसून महाविकास आघाडीने १५ दिवसांत आरपीआयला महाविकास आघाडीत सामावून घेतले नाही.

सकाळ वृत्तसेवा

अमरावती - धर्मांध शक्तींना रोकण्याचा ठेका केवळ आपणच घेतलेला नसून महाविकास आघाडीने १५ दिवसांत आरपीआयला महाविकास आघाडीत सामावून घेतले नाही तर अमरावतीसह पाच लोकसभा मतदारसंघात उमेदवार उभे करण्याचे सूतोवाच रिपाईचे (गवई गट) राष्ट्रीय सरचिटणीस डॅा. राजेंद्र गवई यांनी आज येथे केले.

महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकर यांना सामावून घेतले, मात्र आंबेडकरांचे राजकारण सर्वांनाच माहिती असल्याने त्यांच्या पक्षाचा महाविकास आघाडीतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण होवू शकतो. आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत आजवर जुळवून घेतले आहे. मात्र धर्मांध शक्तींना रोखण्याची जबाबदारी ही एकटी आमचीच नाही.

अद्यापपर्यंत महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून आघाडीत सहभागी होण्याबाबत आपल्याला लेखी पत्र आलेले नाही. महाविकासकडून कुठलाच प्रतिसाद न मिळाल्यास महायुतीचेही पर्याय आमच्यासमोर खुला असेल असे ते म्हणाले. महायुती किंवा महाविकास आघाडीकडून आपल्याला प्रतिसाद न मिळाल्यास अमरावतीसह पाच लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची तयारी आमची असेल.

त्यासंदर्भात पाच फेबु्रवारीला दुपारी एक वाजता अमरावती लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी दर्यापूर येथील नाईक हॉल येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेला रिपाईचे जिल्हाध्यक्ष हिम्मत ढोले व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

काँग्रेसलाही दाखविणार हात

महाविकास आघाडीकडे आम्ही पाच ते सहा जागाांची मागणी केली आहे. त्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास आम्ही आमच्या प्रभाव क्षेत्रातील मतदारसंघात काँगेसलाही हात दाखवू असे डॅा. राजेंद्र गवई म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT