nurse 
विदर्भ

नाव मोठे... काम मोठे... वेतन मात्र सुरक्षा रक्षकापेक्षाही छोटे! 

सकाळ वृत्तसेवा

अमरावती  : सहा वर्षांपूर्वी नियमानुसार महापालिकेच्या सेवेत रूजू झालेल्या डॉक्‍टर व नर्सेंसना आजही सुरक्षारक्षकापेक्षा कमी वेतन दिल्या जात आहे. महापालिकेने आमसभेत ठराव करून शासनाला पाठविला असला तरी त्यावर उत्तर न आल्याने पद व जबाबदारी मोठी असलेल्या डॉक्‍टर व परिचारिकांना तोकड्या वेतनावर काम करण्याची वेळ आली आहे. 

वर्ष 2014 मध्ये महापालिकेतील आरोग्य विभागात रिक्त झालेल्या डॉक्‍टर व परिचारिकांची भरती करण्यात आली. तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी ही भरती नियमानुसार जाहिरात देत आरक्षण बिंदू नामावलीनुसार केली. त्यावेळी भरती झालेल्या डॉक्‍टर व परिचारिकांना निश्‍चित वेतनावर काम करण्याची अट होती. त्यानुसार डॉक्‍टरांना 16 हजार रुपये तर परिचारिकांना साडेसात हजार रुपये वेतन निश्‍चित करण्यात आले. कालांतराने आमसभेत हा विषय आल्यानंतर आमसभेने त्यांना शासकीय नियमानुसार वेतन देण्यास हरकत नसल्याचा प्रस्ताव मंजूर करून अंतिम मान्यतेकरिता शासनाकडे तातडीने पाठवून दिला. 

सहा वर्षांपूर्वी झालेल्या या भरतीत नऊ जणांना नोकरीवर घेण्यात आले व त्यांची नियुक्ती बडनेरा उपनगरातील मनपाच्या मोदी हॉस्पीटलमध्ये करण्यात आली. बराच काळ नियमित वेतनाची प्रतीक्षा केल्यानंतर त्यातील पाच जणांनी राम राम ठोकत नोकरी सोडली. सद्यस्थितीत या मोदी रुग्णालयात दोन डॉक्‍टर व दोन परिचारिका निश्‍चित वेतनावर आहेत. यातील डॉक्‍टर्सना सोळा हजार, तर परिचारिकांना साडेसात हजार रुपये वेतन मिळत आहे. याच रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांना 17 हजार रुपये दरमहा वेतन दिल्या जाते. दोन्ही कर्मचाऱ्यांना वेतन महापालिकाच देत आहे. मात्र पद व जबाबदारी मोठी असलेल्या डॉक्‍टर व परिचारिकांना मात्र सुरक्षा रक्षकापेक्षाही कमी वेतनावर काम करावे लागत आहे. कोविड 19 च्या संक्रमणात या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात या चौघांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे. त्यांना नियमित वेतन देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीचे सदस्य प्रकाश बनसोड यांनी केला आहे. 

महापालिका आमसभेने डॉक्‍टर व परिचारिकांना नियमित सेवेत सामावून घेत त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे वेतन देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यालाही बरीच वर्ष झाली आहेत. मात्र फडणवीस सरकारच्या काळापासून या प्रस्तावास शासनाकडून मान्यता प्रदान करण्यात आलेली नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: पावसाने राज्याची चिंता वाढवली; पण पुढील वर्षासाठी गुड न्यूज! एल निनोबाबत ‘नोआ’नेमका काय वर्तवला अंदाज?

Pilbhit Tiger Reserve: व्याघ्र प्रकल्पात विकेंड सफारी महागली; शनिवार-रविवारचे तिकीट २०० रुपयांवर, काय आहे कारण ?

Team India Live Streaming: सुपर संडे! भारताचे दोन मोठे सामने, Asia Cup Final अन् अफगाणिस्तानविरुद्ध रंगणार टी२०; कुठे पाहाणार?

Ukadiche Modak Recipe: केशराचा सुगंध, नारळ-गुळाची गोडी आणि 'हा' एक पदार्थ… बाप्पासाठी असे बनवा स्पेशल उकडीचे मोदक!

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

SCROLL FOR NEXT