विदर्भ

दिवाळीपूर्वी पगाराचा आनंद ठरला क्षणिक, आदेश काढून केला रद्द

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : दिवाळीपूर्वी पगार होणार की नाही या बद्दल शिक्षकांमध्ये संभ्रम असताना शिक्षण विभागाने शुक्रवारी (ता. 11) शासननिर्णय काढून दिवाळीपूर्वीच पगार करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मात्र, काही वेळातच त्यात बदल करून मनुष्यबळाच्या कमतरतेचे कारण देत, काही तासांतच हा निर्णय रद्द केल्याने शिक्षकांचा हिरमोड झाला आहे. 
धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होत असून रविवारी (ता. 27) दिवाळी आणि 29 ऑक्‍टोबरला भाऊबीज आहे. मात्र, पगार एक तारखेनंतर झाल्यास शिक्षकांचे खिसे रिकामे राहणार आहेत. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्‍यता असून मुलांचाही हिरमोड होईल अशी परिस्थिती होती. त्यामुळे ऑक्‍टोबर पेड इन नोव्हेंबरचा दिवाळीचा पगार दिवाळीपूर्वी होण्याबाबत शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे आणि कार्याध्यक्ष सुभाष मोरे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पत्रव्यवहारही केला होता. या पत्राची दखल घेत, शिक्षण विभागाने शासननिर्णयाद्वारे शिक्षकांना दिलासा मिळाला. मात्र, काही तासांतच हा आदेश रद्द करून पगार देता येणे शक्‍य नसल्याचे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. विभागाकडे ऑनलाइन पगाराची यंत्रणा असताना, केवळ अपुऱ्या मनुष्यबळाचे कारण दिले आहे. मात्र, दिवाळीपूर्वी पगार मिळण्याच्या आनंदावर शिक्षकांमध्ये विरजण पडले आहे. 
सप्टेंबरचा पगार रखडला 
जिल्हा परिषदेतील हजारो शिक्षकांचे पगार अद्याप रखडले आहेत. 11 ऑक्‍टोबर संपला तरी सप्टेंबर महिन्याच्या पगाराचा पत्ता नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये रोष आहे. जुनाच पगार दिला नसल्याने सरकारकडून आदेश काढल्यानंतरही नवा पगार केव्हा मिळेल की नाही? अशी चर्चा शिक्षकांमध्ये आहे. 
धडा शिकविणार 
सातत्याने विरोधात निर्णय घेत सरकारने शिक्षकांच्या भावना दुखावल्या आहेत. शिक्षकांवर लाठीहल्ला, त्यांना हुसकावून लावण्याचे काम सरकारने केले आहे. एकीकडे आतापर्यंत सप्टेंबर महिन्याचा पगार दिलेला नाही. असे असताना शिक्षकांना आता दिवाळीपूर्वी पगार देण्याचे आमिष दाखवून त्यांचा हिरमोड करण्याचे कारस्थान सरकारने केल्याने याबद्दल सरकारला धडा शिकविणार असल्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT