Samadhi of Tukdoji Maharaj is also open for Darshan from today 
विदर्भ

तुकडोजी महाराजांची समाधीही आजपासून दर्शनासाठी खुली; पहिल्या पाच भाविकांचा ‘ग्रामगीता’ देऊन सन्मान

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : राज्य सरकारच्या परवानगीनंतर आता अमरावतीच्या गुरुकुंज मोझरीतील तुकडोजी महाराजांचे प्रार्थना मंदिर व समाधी आज सकाळी सामुदायिक ध्यानानंतर कोरोना काळातील सर्व नियम पाळून भाविकांसाठी खुली करण्यात आली आहे. विशेष म्हणजे समाधीचे दर्शन झाल्यानंतर पहिल्या पाच भाविकांचे औक्षण करून त्यांना तुकडोजी महाराजांची ग्रामगीता भेट देऊन यशोचित सन्मान करण्यात आला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील तब्बल आठ महिन्यांपासून राज्यभरातील सर्व छोटे मोठे धार्मिक स्थळे हे बंद होते. त्यामुळेच राज्यातील महत्वाचे धार्मिक स्थळ असलेली तुकडोजी महाराज यांची गुरुकुंज मोझरीतील महासमाधी ही बंद होती. आता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या परवानगीनंतर ही समाधी ही आज सकाळी सामुदायिक ध्यानानंतर भाविकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे.

तुकडोजी महाराज यांची समाधी ही खुल्या मैदानात असल्याने लॉकडाऊनमध्ये ही रस्त्यावरूनही तुकडोजी महाराजांच्या समाधीचं दर्शन हे भाविकांना घेत होते. परंतु, आता त्यांना आत जाऊन दर्शन घेता येणार आहे.

दरम्यान, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला दरवर्षी लाखो गुरुदेव भक्त उपस्थिती लावत असतात. परंतु, यावर्षी कोरोनाच्या या काळात मंदिरे बंद असल्यामुळे मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीमध्ये तुकडोजी महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव पार पडला होता.

संपूर्ण समाधी परिसर सॅनिटाईझ

मंगळवारी पहिल्या पाच भविकांना ग्रामगीता भेट देण्यात आली. तत्पूर्वी, काल संस्थानच्या वतीने संपूर्ण समाधी परिसर सॅनिटाईझ करण्यात आला होता. आजपासून दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेवटचे २४ तास! CJP ने ज्ञानेश कुमारांना पुन्हा दिला इशारा, राजीनाम्यासाठी आक्रमक; २ ऑक्टोबरपासून आंदोलनावर ठाम

Sign Language Day: आता खुणांच्या भाषेतही ऐकणार पोलिस; कर्णबधिर नागरिकांसाठी पोलिसांचे विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय

Asian Games 2026 Kabaddi: भारतीय महिलांची 'सुवर्ण' पकड! इराणची कडवी टक्कर मोडली अन् शेवटच्या क्षणाला बाजी मारली

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT