samajvadi party workers agitation for electric bill in front of mla kishor jorgewar house 
विदर्भ

'समाजवादी'चा आमदार जोरगेवारांच्या कार्यालयासमोर ठिय्या, छायाचित्रांवरही फेकली शाही

श्रीकांत पेशट्टीवार

चंद्रपूर : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना दोनशे युनिट वीज मोफत देण्याच्या आश्‍वासनाची पूर्तता न केल्यामुळे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर बुधवारी (ता. 6) ठिय्या आंदोलन केले. एका आंदोलकाने आमदार जोरगेवार यांच्या छायाचित्रावर शाई फेकली. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. त्यानंतर पोलिस पोहोचले आणि आंदोलकांना पिटाळून लावले.

विधानसभा निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी निवडून आल्यास दोनशे युनिट चंद्रपूरकरांना मोफत उपलब्ध करून देऊ, असे आश्‍वासन दिले होते. विधानसभा निवडणुकीत मोठ्या मतांनी आमदार किशोर जोरगेवार निवडून आले. आमदार होऊन एका वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र, त्यांनी दिलेल्या आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. या आश्‍वासनाच्या पूर्ततेची मागणी घेऊन समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (ता. 6) आमदार किशोर जोरगेवार यांचे पठाणपुरा मार्गावर असलेले कार्यालय गाठले. तिथे ठिय्या मांडला.

दरम्यान, एका आंदोलकाने आमदार किशोर जोरगेवार यांच्या छायाचित्रावर शाई फेकली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. आमदार जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयावर समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते ठिय्या मांडून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या परिसरात पोहोचले. त्यांनी आंदोलकांना पिटाळून लावले. छायाचित्रावर शाई फेकणाऱ्या आणि कार्यालयात धुडगूस घालणाऱ्या समाजवादी पक्षाच्या कार्यकत्याविरोधात यंग चांदा बिग्रेडच्यावतीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वृत्त लिहीस्तोवर गुन्हा दाखल झालेला नव्हता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाल वायरवर पाय पडला अन्.., काळाचौकीच्या गणपती मंडपासमोर अघटित घडलं; मध्यरात्री 2 वाजताचा थरारक घटनाक्रम समोर

Asian Games,Cricket: भारतीय संघाचे सलग दुसऱ्यांदा मेडल पक्के! बांगलादेशला पराभूत करत फायनलमध्ये धडक

Mohol Ganesh Mandal Youth Death : गणेश मंडळात चक्कर येऊन 24 वर्षीय तरुणाचा मृत्यू; बेशुद्ध होऊन खाली जमिनीवर कोसळला अन्..., कार्यकर्त्यांमध्ये हळहळ

Manwat Parbhani Highway Bridge : पुलाचे काँक्रीट निखळले, सळ्याही उघड्या मानवत-परभणी राष्ट्रीय महामार्गावर प्रवासी-वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Marathi News Live Updates : 'यूपीआय'वरील शुल्काचा पुनर्विचार करा; ग्राहक पंचायतची मागणी

SCROLL FOR NEXT