Vidarbha News sakal
विदर्भ

Vidarbha News: शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीत घेतले गाडून...

Vidarbha News: गारपीट, अतिवृष्टीच्या मदतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर, ता.गारपीट, अतिवृष्टी व अवेळी झालेल्या पावसामुळे नुकसानीच्या मदतीच्या सर्व्हेतून शेतकऱ्यांची नावे संग्रामपूर तहसील कार्यालयाने वगळल्याचा आरोप करत तालुक्यातील काथरगांव पिंप्री व शिवारातील शेतकऱ्यांनी ता.१ ऑक्टोबर रोजी स्वतःला अर्धे अधिक जमिनीत बुजवून घेतले. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे प्रशासनात खळबळ उडाली होती.

तालुक्यात गारपीट व अतिवृष्टी तसेच अवेळी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान संग्रामपूर तहसील कार्यालयाकडून नुकसानीचे सर्व्हे करण्यात आले. यावेळी सर्वेच्या यादांमधून तालुक्यातील काथरगाव पिंप्री शिवारातील शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आली असून शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करत आज शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले.

यावेळी काथरगाव पिंप्री येथे शेतकरी व महिलांनी खड्डा खोदून स्वतः खड्ड्यात शरीराचा अर्धा भाग बुजवून घेतला. या आंदोलनात संरपच सुवर्णा टापरे, उपसरपंच लीला संजय मुंडे, सुमेध हातेकर, प्रियाताई गोलर, विलास कंकाळ, संजय मुंडे, सुधाकर डाखोरे, निळकंठ माळोकार, संदिप खराटे, रोशन हातेकर, राहुल तायडे, गणेश टापरे आदीं शेतकऱ्यानी भुमिगत करुन आंदोलन केले. यावेळी गावकरी, महीला, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thalapathy Vijay: थलापती विजयच्या दारात सत्तेची ‘ऑफर’! भाजप म्हणते उपमुख्यमंत्री व्हा, पण विजयची नजर थेट मुख्यमंत्रिपदावर?

फक्त 50 हजार रुपयांत स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च; खरेदीसाठी लागल्या रांगा, पाहा सर्व डिटेल्स एका क्लिकवर

Summer Health Tips: उन्हाळा आला…आरोग्याची काळजी घ्या! तब्येत सांभाळण्यासाठी काय खावं, काय टाळावं ते जाणून घ्या

Latest Marathi Live Update : नाशिकमध्ये परप्रांतीय ठेकेदाराकडून सुपरवायझरला बेदम मारहाण

LPG Gas Shortage: वडापाव चाळिशीपार, चहा तिशीला! चाकण औद्योगिक वसाहतीतील स्थिती; भजी खाणेही आवाक्याबाहेर

SCROLL FOR NEXT