मृत सानिया सय्यद  
विदर्भ

14 डिसेंबरला शाळेत गेली सानिया... नंतर आली ही बातमी

सकाळ वृत्तसेवा

साकोली (जि. भंडारा) :पंचशील वॉर्डातील सानिया ही कटकवार विद्यालयाची दहाव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. गेल्या 14 डिसेंबरला ती शाळेत गेली; तेव्हापासूनच ती बेपत्ता होती. सानिया इम्रान सय्यद (वय 14) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

पित्याने केली बेपत्ताची तक्रार

पंचशील वॉर्डातील सानिया ही कटकवार विद्यालयाची दहाव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. गेल्या 14 डिसेंबरला ती शाळेत गेली; तेव्हापासूनच ती बेपत्ता होती. याबाबत इम्रान सय्यद यांनी साकोली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु, पोलिसांना तिचा ठावठिकाणा शोधून काढता आला नाही. त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे याबाबत निवेदन देऊन मुलीचा शोध घेण्याची विनंती पालकांनी केली होती.

मृतदेहाची ओळख पटली

वनविभागाची रोपवाटिका असलेल्या पहाडी परिसरात बुधवारी (ता. 22) सकाळी दुर्गंधी येत होती. त्याबद्दल शोध घेतला असता तेथे मृतदेह आढळून आला. नंतर तो सानिया सय्यद हिचाच मृतदेह असल्याची ओळख पटली. ही विद्यार्थिनी बेपत्ता झाल्यावर 40 दिवसांनी कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळला आहे.

अपहरणानंतर खून?

साकोली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यावर फॉरेन्सिक विभागाच्या चमूला पाचारण करण्यात आले. मृतदेह कुजलेला असल्यामुळे घटनास्थळीच उत्तरीय तपासणी करण्यात आली. पोलिसांच्या तपासानंतरच या घटनेतील रहस्य उलगडेल. परंतु, तिचे अपहरण करून नंतर तिचा खून करण्यात आल्याची परिसरात चर्चा आहे.

भंडारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

'प्रेमाची गोष्ट'च्या पाठोपाठ छोट्या पडद्यावरील आणखी एक मालिका घेणार निरोप; कलाकारांनी शेअर केली भावुक पोस्ट

High BP Causes: 'या' 3 दैनंदिन सवयी बनतात उच्च रक्तदाबाचं मुख्य कारण! आजच बदल करा

Bank of Baroda Recruitment: पदवीधरांसाठी नोकरीची सुवर्णसंधी! बँक ऑफ बड़ौदामध्ये 2500 पदांसाठी भरती सुरु; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया, निवडपद्धत आणि वेतन

SCROLL FOR NEXT