Sanitizers administered to children during polio vaccination in Yavatmal 
विदर्भ

किती हा हलगर्जीपणा; पोलिओच्या नावाखाली बालकांना पाजले सॅनिटायझर

राजकुमार भीतकर

यवतमाळ : पोलिओ लसीऐवजी १२ बालकांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याची घटना घाटंजी तालुक्यातील कापसी (कोपरी) येथे घडली. या सर्व मुलांची प्रकृती बिघडल्याने येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांनी रुग्णालयात भेट देऊन बालकांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहिमेला रविवारी, ३१ जानेवारीपासून सुरुवात झाली. घाटंजी तालुक्यातील कापसी (कोपरी) येथे १२ बालकांना लस पाजण्याऐवजी चक्क सॅनिटायझर पाजल्याची घटना घडली आहे. ही सर्व मुले एक ते ५ या वयोगटातील आहेत. मुलांना उलटीचा त्रास झाल्याने पालकांच्या ही गोस्ट लक्षात आली. त्यामुळे रात्रीच १२ बालकांना रुग्णालयात भरती करण्यात आले.

या घटनेची संपूर्ण चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ करीत आहेत. मुलांना लस म्हणून सॅनिटाझर पाजण्यात आले हे केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी काही वेळाने त्या सर्वांना पोलिओ लस दिली. घटना घडल्यानंतर उशिरापर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेची माहिती दिली गेली नव्हती, असे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.

३१ जानेवारीपासून देशात राष्ट्रीय पोलिओ लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रीय पोलिओ लसीकरण दिनी ३० जानेवारीला राष्ट्रपती भवनात काही मुलांना पोलिओ थेंब देऊन मोहिमेची सुरुवात केली. या मोहिमेअंतर्गत ५ वर्षांपर्यंतच्या मुलांना पोलिओ थेंब देण्यात येणार असून, ही मोहीम 2 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

या बालकांना पाजले सॅनिटायझर

कापसी हे गाव घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येते. गिरीश किसन गेडाम, योगीश्री किसन गेडाम, अंश पुरुषोत्तम मेश्राम, हर्ष पुरुषोत्तम मेश्राम, भावना बापूराव आरके, वेदांत नितेश मेश्राम, राधिका नितेश मेश्राम, प्राची सुधाकर मेश्राम, तनुज राम गेडाम, निशा प्रकाश मेश्राम व आस्था प्रकाश मेश्राम अशी सॅनिटायझर पाजण्यात आलेल्या बालकांची नावे आहेत. त्यांना यवतमाळ येथील मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्यात आले आहे.

कुणाकडून चूक झाली याचा तपास सुरू

संपूर्ण प्रकार गंभीर असून, यात कोणाकडून चूक झाली याची चौकशी सुरू आहे. ज्यावेळी मुलांना लस देण्यात आली, त्यावेळी लसीकरण केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी, आशा सेविका आणि अंगणवाडी सेविका हे तिघे जण हजर होते. तिघांपैकी कुणाकडून ही चूक झाली याचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला लवकरात लवकर खेळवा, तो... रवी शास्त्री स्पष्ट इशारा; गावसकरांनी केलं मोठं भाष्य

Navi Mumbai News : पावसाच्या पाण्यात उतरला विद्युतप्रवाह, शॉक लागताच २ विद्यार्थीनी रस्त्यातच पडल्या; महापौर आणि MSEBचे एकमेकांकडे बोट

Fifa World Cup : हॅरी केनचा दुहेरी गोलांचा धमाका; इंग्लंडचा काँगोवर २-१ असा दमदार विजय

World Sports Journalists Day 2026: 2 जुलैलाच का साजरा केला जातो जागतिक 'क्रीडा पत्रकार दिन'? जाणून घ्या इतिहास

'बाल्कनीतून खाली उडी...' मंदार जाधवने सांगितला डिप्रेशनमधला थरकाप उडवणारा प्रसंग, म्हणाला 'काम नव्हतं म्हणून...'

SCROLL FOR NEXT