संजय देशमुख Sakal
विदर्भ

माजी क्रीडामंत्री कबड्डीच्या मैदानात; संजय देशमुखांनी थोपटल्या मांड्या

संजय देशमुख पाहता पाहता मैदानात उतरले अन् कबड्डी कबड्डीचा आवाज प्रेक्षकांच्या कानावर पडू लागला.

सकाळ वृत्तसेवा

दिग्रस (जि. यवतामाळ) : कबड्डी कबड्डी चा आवाज सुरू झाला अन् दिग्रसच्या क्रीडा संकुल वर आयोजित कबड्डीच्या खुल्या सामान्यांना सुरुवात झाली. काही वेळ कबड्डीचा खेळ चालल्यानंतर माजी कबड्डीपटू असलेले राज्यमंत्री संजय देशमुख यांना सुद्धा कबड्डी खेळण्याचा मोह आवरता आला नाही. अन् माजी कबड्डीपटू आणि सोबतच माजी क्रीडा राज्यमंत्री असलेले संजय देशमुख पाहता पाहता मैदानात उतरले अन् कबड्डी कबड्डीचा आवाज प्रेक्षकांच्या कानावर पडू लागला.

देशात प्रो कबड्डी लीगचे वारे सुरू आहेत. प्रो कबड्डी सध्या मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. प्रो कबड्डीमुळं कबड्डीपटूंना सुद्धा चांगले दिवस आलेत. त्यामुळं एकंदरीत कबड्डी स्पर्धेला चांगलं बळ मिळालंय. यवतमाळ जिल्ह्यात असलेल्या दिग्रस शहराची कबड्डीची पंढरी म्हणून जगभरात ख्याती आहे. सध्या कबड्डी खेळाचे प्रमाण कमी झाले होते. कोरोनामुळं खेळावरही बंदी आली होती. हळूहळू सर्वकाही पूर्वपदावर येत आहे.

शहराप्रमाणे ग्रामीण भागातही कबड्डीचे आयोजन केले जाते. दिग्रस येथे अनएकवेळा खुल्या कब्बडी सामन्यांचे आयोजन केले जाते, यात मान्यवरांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलाविले जाते. यंदा दोन वर्षानंतर आयोजित कबड्डीच्या खुल्या सामान्यांच्या आयोजनाच्या कार्यक्रमात दिग्रस विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुख यांना बोलाविण्यात आले होते. त्यामुळं त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. आपणही कबड्डी खेळावे, असा मोह त्यांना यावेळी झाला.

संजय देशमुख झाले बाद

माजी क्रीडा राज्यमंत्री असल्याने त्यांनी कबड्डीच्या मैदानात उडी घेतली. कबड्डी कबड्डी म्हणून मांड्या थोपाटल्या. थेट चढाई केली. खेळाडू तरबेज होते. त्यांना सुरुवातीला संजय देशमुख यांना चांगले खेळूही दिले. देशमुखही खेळात चांगलेच रमले होते. अशात ते खेळाडू बाद करण्याच्या बेतात होते. पण, खेळाडूंनीच त्यांच्यावर चढाई केली. सीमेच्या आतच अडविले. त्यामुळं ते सीमारेषा क्रास करू शकले नाही. अशाप्रकारे संजय देशमुख बाद झाले.

खिलाडी वृत्तीने खेळत राहू

कबड्डीच्या खुल्या सामान्यांच्या उदघाटन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या संजय देशमुख कबड्डीच्या मैदानात उतरले. त्यामुळं खेळाडूंमध्ये उत्साह संचारला होता. पण, त्यांना बाद केल्याशिवाय खेळाडूही काही शांत बसले नाहीत. क्रीडा राज्यमंत्री राहिलेले देशमुख यांचा २०१९ च्या निवडणुकीत निवडूण आले नाहीत. त्यामुळं त्यांना विधानसभेच्या बाहेर व्हावं लागलं होतं. कबड्डीच्या खेळातही खेळाडूंनी बाद केले म्हणून काय झाले. संजय देशमुख हे खेळाडू आहेत. आता कबड्डीच्या सामन्यात हरलो म्हणून काय झालं, खिलाडी वृत्तीनं खेळत राहू आणि पुन्हा बाजी मारू, अशी प्रतिक्रिया माजी क्रीडा राज्यमंत्री संजय देशमुखांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठा बदल! आज 24 कॅरेट, 22 कॅरेट आणि 18 कॅरेटचा दर किती?

Viral Video : आरती सुरु असतानाच पुजाऱ्याला हृदयविकाराच्या झटका, जागेवरच मृत्यू; व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Update : जयंत पाटील वर्षावर गेले, म्हणजे राजकारणात ट्विस्ट आहे; राष्ट्रवादीच्या नेत्याचं विधान

IND vs ENG 1st ODI: अक्षर पटेलची ऐतिहासिक कामगिरी! सचिन तेंडुलकर, हार्दिक पांड्या, युवराज सिंगसह सहा जणांशी बरोबरी

Sangli Crocodile Attack : काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! मगरीने आधी खांदा पकडला, मग मानेवर झडप; पाठीत दात घुसल्याने गंभीर जखमी, 60 वर्षीय नागरिकाची मृत्यूशी झुंज

SCROLL FOR NEXT