Sanjay Rathod-Bhavana Gawali
Sanjay Rathod-Bhavana Gawali Sakal
विदर्भ

भावना गवळी, संजय राठोडांना सेनेचा दणका; पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या

दत्ता लवांडे

यवतमाळ : यवतमाळमधील खासदार भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांना शिवसेनेकडून धक्का देण्यात आला आहे. शिवसेनेकडून दारव्हा, दिग्रज आणि नेरमधील पदाधिकाऱ्यांच्या जागी नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ज्या पदाधिकाऱ्यांच्या जागी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत ते राठोड आणि भावना गवळी यांचे समर्थक होते.

(Bhawna Gavli And Sanjay Rathod)

शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयातून या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. खासदार भावना गवळी आणि आमदार संजय राठोड यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने शिवसेनेकडून पावले उचलले गेले आहेत. यवतमाळचे ठाकरे गटाचे नेते विश्वास नांदेकर, पराग शिंदे, राजेंद्र गायकवाड हे मुंबईत होते. शिवसेनेने शिंदे गटातील गवळी आणि राठोड यांना पाठिंबा देणाऱ्या कार्यकर्त्यांची हकालपट्टी करत नव्याने नियुक्त्या केल्या आहेत.

दरम्यान, भावना गवळी यांनी बंडखोरांचे समर्थन करत उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्यामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासहित बंडखोरांचे समर्थन केले होते. त्यामुळे शिवसेनेने त्यांचे लोकसभेतील शिवसेनेचे मुख्यप्रतोदपद काढून घेतले होते. त्यानंतर त्या शिंदे गटाला पाठिंबा देण्याच्या मार्गावर आहेत आमदार संजय राठोड यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड आणि भावना गवळी यांना पक्षात जागा नाही असं दोन दिवसांपूर्वी म्हटलं होतं. त्यानंतर राठोड आणि गवळी यांच्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या जागेवर नव्याने नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : कंगना रणौत यांच्या रॅलीवर दगडफेक; काँग्रेसविरोधात निवडणूक आयोगाकडे भाजपची तक्रार

Rohit Sharma: रोहितच्या 'त्या' गंभीर आरोपावर स्टार स्पोर्ट्सचं स्पष्टीकरण; म्हणाले, 'क्लिपमध्ये फक्त...'

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT